सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव होण्याासाठी सर्वच स्तरातून  प्रयत्न केला जात आहे. अगदी  घरात राहून सुद्धा व्हायरसपासून वाचण्यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवून कशाप्रकारे रोगांपासून बचाव करता येईल. यासाठी प्रयत्न केला जात आहे. कारण जर व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोणत्याही प्रकारच्या व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनवर मात करून तुम्ही बरे होऊ शकता. पण तुम्हाला माहितही नसेल  तुमच्या आहार घेण्याच्या पध्दतीतील चुकांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. 


मीठामुळे कमी  होते रोगप्रतिकारकशक्ती

जर्मनीच्या युनिव्हरसिटी हॉस्पिटल बॉनच्या रिसर्चकर्त्यांच्यामते जास्त मीठाचा आहार घेतल्यामुळे गंभीर विषाणूंचे संक्रमण होऊ शकतं. एका  दिवसात ६ ग्रामपेक्षा जास्त  मीठाचं सेवन तुमची रोगप्रतिकराकशक्ती कमी करू शकतं. साइंस ट्रांसलेशनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार जे लोक ६ ग्रामपेक्षा जास्त मीठाचं सेवन करतात. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते परिणामी मीठातील सोडियम क्लोराईडमुळे  रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हार्ट स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या आजारांचं शिकार होऊ शकता. 

जास्त मीठ खाल्याने शरीरात नैसर्गिक प्रक्रिया व्यवस्थित काम  करत नाहीत. भारतात सर्वाधिक लोकांचा मुत्यू कॅन्सरमुळे  होतो. त्यात गॅस्टीक कॅन्सर म्हणजेच पोटाचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो. प्रत्येक वर्षी ७० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मुत्यू  कॅन्सरमुळे होतो.  आहारात मीठाचं सेवन कमी केल्यास  कॅन्सरपासून लांब राहता येऊ शकतं.

जास्त मीठाचं सेवन केल्यामुळे लिकोबॅक्टर पाइलोरीचा विकास होत असतो. त्यामुळे बॅक्टेरीयाचा शिरकाव होऊन तुम्हाला सुज येणं, पोटाचं अल्सर होणं. ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे  रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवायची असेल तर मीठाचं सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे.

Web Title: The immune system can be low by doing this mistake in diet myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.