शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

कोरोनाची लस एक पण परिणाम वेगवेगळे, असं का? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर, जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 6:39 PM

एकाच कोरोना लसीचे प्रत्येकावर वेगवेगळे परिणाम होताना दिसत आहेत (Corona vaccine effects). कुणावर या लसीचा चांगला प्रभाव दिसून येतो, तर कुणावर ही लस कमी परिणामकारक ठरते. असं का होतं? याचं नेमकं उत्तर संशोधकांना सापडलं आहे. याचं कारण ते म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अँटिबॉडीज (Antibodies) आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity).

सध्या कोरोनापासून बचावासाठी कोरोना लसीकरण (Corona vaccine) सुरु आहे. पण एकाच कोरोना लसीचे प्रत्येकावर वेगवेगळे परिणाम होताना दिसत आहेत (Corona vaccine effects). कुणावर या लसीचा चांगला प्रभाव दिसून येतो, तर कुणावर ही लस कमी परिणामकारक ठरते. असं का होतं? याचं नेमकं उत्तर संशोधकांना सापडलं आहे. याचं कारण ते म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या अँटिबॉडीज (Antibodies) आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity).

हाताची पाच बोटं जशी सारखी असत नाहीत किंवा प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगवेगळे असतात, तशीच प्रत्येक माणसाची रोगप्रतिकार शक्तीही  वेगवेगळी असते. म्हणूनच कोविड-१९ प्रतिबंधक लशी काही व्यक्तींवर कमी प्रभावी ठरतात, असं शास्त्रज्ञांना आढळलं आहे.

नेदरलँड्समधल्या यूट्रेक्ट विद्यापीठात रसायनशास्त्र आणि औषधशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा. अल्बर्ट जे. आर. हेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून ही बाब दिसून आली आहे. कोणताही आजार नसलेल्या आणि आजारी असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या रक्तातल्या अँटीबॉडीजवर संशोधन केल्यानंतर रोगप्रतिकारशक्तीतली ही विविधता लक्षात आली, असं त्यांनी म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातल्या विशेष प्रभावी अँटीबॉडीज कोणत्या आहेत, त्या कशा ओळखायच्या, त्याचा दुसऱ्या व्यक्तींच्या आजारात काही उपयोग करता येतो का, आदींसाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.

आपल्या रोजच्या आयुष्यात आपलं शरीर अनेक रोगजंतूंशी लढत असतं. कारण अनेक रोगजंतूंचा हल्ला शरीरावर होत असतो. आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोगजंतू मोठ्या चतुराईने आपल्या शरीरात प्रवेश करत असतात; पण आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती त्या सगळ्यांना समर्थपणे सामोरं जात असते. आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम असेल, तर आपलं शरीर जास्तीत जास्त रोगजंतूंचा सामना चांगल्या प्रकारे आणि सातत्याने करू शकतं. त्यासाठी शरीरातले प्रोटीनयुक्त अणू म्हणजेच अँटीबॉडीज शस्त्राप्रमाणे काम करत असतात.

प्रत्येक रोगजंतूशी प्रभावीपणे लढण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांची म्हणजेच वेगवेगळ्या अँटीबॉडीजची गरज असते. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या कोट्यवधी अँटीबॉडीज असतात, म्हणून हे शक्य होतं. तरीही या सगळ्या अँटीबॉडीजची निर्मिती एकाच वेळी होऊ शकत नाही. काही विशिष्ट अँटीबॉडीज एखाद्या विशिष्ट रोगजंतूच्या हल्ल्यानंतरच तयार होतात.

शरीरावर बॅक्टेरिया (Bacteria) अर्थात जीवाणूंचा हल्ला झाला, तर शरीर त्यांना प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज तयार करतं. कोरोना विषाणूचा हल्ला झाला, तर शरीर त्याला विरोध करणाऱ्या अँटीबॉडीज तयार करतं. फ्लू व्हायरस शरीरात घुसला, तर शरीर त्याला नामोहरम करणाऱ्या अँटीबॉडीज बनवतं. आपल्या रक्तात किती वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज बनतात आणि किती प्रकारच्या आधीपासूनच अस्तित्वात असतात, हे पूर्वी ज्ञात नव्हतं. आता अनेक शास्त्रज्ञांनी लावलेल्या अंदाजानुसार या अँटीबॉडीजची संख्या कोटींच्या घरात असते.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील अँटिबॉडीज वेगवेगळ्याआपल्या शरीरात कोट्यवधी अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता आहे; पण या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात त्यांना काही आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या. कोणताही आजार न झालेल्या आणि आजारी अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या रक्तप्रवाहात हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये असलेल्या अँटीबॉडीजची संख्या शेकड्यातच होती. शास्त्रज्ञांना रक्ताच्या थेंबांचं परीक्षण करताना असं आढळलं, की रोगजंतूंविरोधात प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. प्रत्येक व्यक्तीच्या अँटीबॉडीचं प्रोफाइल वेगवेगळं असतं.

या अँटीबॉडीजचं कॉन्सन्ट्रेशन आजारपणात किंवा लसीकरणानंतर एका वेगळ्याच पद्धतीने बदलतं. त्यावरून काही व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गामुळे अधिक धोका का असतो आणि काही व्यक्ती संसर्ग झाला तरी लवकर बऱ्या का होतात, हे लक्षात यायला मदत होईल. आतापर्यंत शास्त्रज्ञ असं मानत होते, की रक्तातल्या अँटीबॉडीजच्या गुंतागुंतीच्या मिश्रणाचा नेमका थांग लावणं अवघड आहे; मात्र मास स्पेक्ट्रोमेट्रीच्या साह्याने एखाद्या पदार्थाचे घटक त्यांच्या आण्विक संरचनेच्या आधारे वेगवेगळे करणं शक्य होतं. प्रत्येक अँटीबॉडीची आण्विक संरचना वेगवेगळ्या प्रकारची असल्याने प्रत्येक प्रकारच्या अँटीबॉडीज ओळखणं आणि त्यांच परीक्षण करण्याचं तंत्र शोधण्यात यश मिळाल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

जवळपास १०० व्यक्तींच्या अँटीबॉडी प्रोफायलिंगसाठी या तंत्राचा उपयोग करण्यात आला. त्यात कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या व्यक्ती आणि कोविड-१९चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा समावेश होता. एकच लस घेतलेल्या व्यक्तींमध्येही अँटीबॉडीज वेगवेगळ्या प्रकारच्याच आढळल्या, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. म्हणजेच प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगवेगळे असतात, तसंच या अँटीबॉडीजचं आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स