शरीरात जमा झालेले किटाणू गंभीर आजारांना देऊ शकतात निमंत्रण, 'या' उपायाने राहा निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 09:53 AM2020-05-17T09:53:32+5:302020-05-17T09:54:37+5:30

दीर्घकाळपर्यंत हे बॅक्टेरिया शरीरात असतात. तेव्हा सतत तोंडात थुंकी जमा होण्याची समस्या उद्भवते.

How to take care of gut health with home remedies to bad bacteria of gut myb | शरीरात जमा झालेले किटाणू गंभीर आजारांना देऊ शकतात निमंत्रण, 'या' उपायाने राहा निरोगी

शरीरात जमा झालेले किटाणू गंभीर आजारांना देऊ शकतात निमंत्रण, 'या' उपायाने राहा निरोगी

googlenewsNext

आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे  बॅक्टेरिया असतात.  त्यातील काही आपल्या शरीरासाठी चांगले असतात. तर काही नुकसानकारक ठरतात. म्हणून वेळीच या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ज्यावेळी दीर्घकाळपर्यंत हे बॅक्टेरिया शरीरात असतात. त्यावेळी सतत तोंडात थुंकी जमा होण्याची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही शरीरातील नुकसानकारक बॅक्टेरिया शरीराबाहेर फेकू शकता. 

पोटात कोणते बॅक्टेरिया असतात

शरीरात प्रामुख्याने फर्मिक्यूट, बॅक्टेरॉइड, एक्टिनोबॅक्टीरिया आणि प्रोटोबॅक्टीरिया असतात. ते पोटासाठी फायदेशीर समजले जातात. याशिवाय काही बॅक्टेरिया असतात ते नुकसानकारक ठरतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही. परिणामी गंभीर आजार होतात. 

उपाय 

पोटात असलेले नुकसानकारक बॅक्टेरिया मारण्यासाठी लिंबाचा वापर फायदेशीर ठरेल. लिंबू हा सर्वत्र सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. लिंबात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटामीन सी आणि सिट्रिक एसिड असतं. यामुळेच पोटात असणारे बॅक्टेरिया लिंबाच्या सेवनाने नाहीसे होतात. 

सगळ्यात आधी लिंबू कापून घ्या. त्यानंतर लिंबाचा रस काढा. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. नंतर या पाण्याचे सेवन करा. लिंबात अनेक एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यातील सिट्रिक एसिड बॅक्टेरियांना मारण्यासाठी फायदेशीर ठरतं.  आठवड्यातून कमीत कमी २ वेळा या ड्रिंकचे सेवन करणं आवश्यक आहे. त्यामुळे पोटातील घाण निघून जाण्यात मदत होईल. तसंच आरोग्य चांगलं राहील.

(पुरूषांमधील टेस्टोस्टोरॉन हार्मोन आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध जाणून घ्या)

(युरिक अ‍ॅसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय)

 

Web Title: How to take care of gut health with home remedies to bad bacteria of gut myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.