कोरोना काळात आनंदी राहण्याचा खास फंडा; वाचा या टीप्स...टेन्शन होईल गुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:14 PM2021-06-04T20:14:55+5:302021-06-04T20:16:21+5:30

कोरोनाच्या या कठीण काळात आपलं मानसिक आरोग्य सुरळीत राखणं फार महत्त्वाचं आहे. या अशा काही टीप्सचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात करू शकता आणि आनंदी राहु शकता.

How stay happy during the Corona period; Read these tips ... there will be no tension | कोरोना काळात आनंदी राहण्याचा खास फंडा; वाचा या टीप्स...टेन्शन होईल गुल्ल

कोरोना काळात आनंदी राहण्याचा खास फंडा; वाचा या टीप्स...टेन्शन होईल गुल्ल

Next

कोरोनाच्या या कठीण काळात आपलं मानसिक आरोग्य सुरळीत राखणं फार महत्त्वाचं आहे. या अशा काही टीप्सचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात करू शकता आणि आनंदी राहु शकता.

  • या कठीण काळात तुम्हाला स्वतःला स्वतःच समजून घ्यावं आणि समजवावं लागेल. तुम्हाला फक्त तुम्हीच खूश ठेवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही स्वतःला कायम पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयन्त करा. डोक्यात सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा आणि ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचाही विचार करा. आधी प्रॉब्लेम आहे हे मान्य करा आणि त्यानंतर त्यावर उपाय शोधा.
  • सध्या लॉकडाऊनमुळे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेटू शकत नाही, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकत नाही. त्यामुळे येणारा एकटेपणा घालवण्यासाठी स्वतःला कामात व्यस्त ठेवा.
  • तुमच्यासोबत काही वाईट झालंय किंवा जवळचा एखादा व्यक्ती सोडून गेला असेल तर डिप्रेस होण्याऐवजी मनात पॉझिटिव्ह विचार आणा. चांगल्या आठवणी आठवा आणि खूश राहण्याचा प्रयत्न करा.त्या दुःखांना वाट मोकळी करून द्या. वाटल्यास तुम्ही जोरात रडून घ्या. रडल्याने  मन हलकं होतं. लोकांसोबत तुमचे विचार शेअर करा. फोनवर मित्रांशी बोला किंवा सोशल मीडियावर व्यक्त व्हा.
  • मेडिटेशन करा. मेटिडेशन करणं हे एका कोर्सप्रमाणे असून शरीर या गोष्टींना स्वीकारेपर्यंत त्यात नियमितता असली पाहिजे. तसंच स्वतःला वेळ देणंही गरजेचं आहे. त्यामुळे एक टाईम टेबल बनवा आणि शरीराच्या अनुसार मेडिटेशन करा. मेडिटेशन करण्यासाठी कोणतीच वेळ नसते. तुम्हाला जेव्हा तणाव जाणवेल तेव्हा तुम्ही मेडिटेशन करू शकता. 

Web Title: How stay happy during the Corona period; Read these tips ... there will be no tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.