Pregnancy दरम्यान स्ट्रेसपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 10:38 IST2019-10-23T10:35:00+5:302019-10-23T10:38:28+5:30
प्रेग्नन्सी दरम्यान महिलांनी तणावाला दूर ठेवावं. कारण ताण करून घ्याल तर गर्भधारणेदरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक थकवाच नाही तर गंभीर स्थिती झाली तर मिसकरेजचं कारणही ठरू शकतं.

Pregnancy दरम्यान स्ट्रेसपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!
(Image Credit : cbsnews.com)
प्रेग्नन्सी दरम्यान महिलांनी तणावाला दूर ठेवावं. कारण ताण करून घ्याल तर गर्भधारणेदरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक थकवाच नाही तर गंभीर स्थिती झाली तर मिसकरेजचं कारणही ठरू शकतं. त्यामुळे तणावापासून दूर राहण्यासाठी प्रेग्नन्ट महिलांनी सर्व प्रयत्न करावेत. तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
अॅक्टिव रहा
आजकालच्या लाइफस्टाईलमध्ये आपण सगळेच फिजिकली फार जास्त अॅक्टिव राहतो. कारण आता आपल्याकडे जास्त काम बसून किंवा उभं राहून केलं जातं. अशात शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या एक्सरसाइज आणि वॉक करा. गर्भवती महिलांनी स्वत:ला सुरूवातीच्या दिवसात फिजिकली अॅक्टिव ठेवलं पाहिजे. याने त्यांना डिलिव्हरीवेळी येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करण्यास मदत मिळते.
डाएटची घ्या पुरेशी काळजी
प्रेग्नन्सी दरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात होतात. असात गरजेचं आहे की, तुम्ही आहारातून मिळणाऱ्या पोषक तत्वांवर लक्ष द्यावं. डॉक्टरने सुचवलेल्या सर्वच पदार्थांचं आणि औषधांचं सेवन वेळेवर करा. फळं आणि डाळी जास्तीत जास्त सेवन करा.
तुमची आरामाचा वेळ
प्रेग्नन्सीदरम्यान तुम्ही झोपेचीही पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तज्ज्ञांचं मत आहे की, जर गर्भवती महिला पुरेशी झोप घेतील तर याचा सकारात्मक प्रभाव बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही पडतो. याने बाळाच्या विकासात मदत मिळते. सोबतच महिलांचं शरीरही यादरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्यासाठी सक्षम होतं.हार्मोनल लेव्हल योग्य राहतं. त्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे.