शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

प्रायव्हेट पार्ट्सला होणारे इन्फेक्शन 'या' उपायांनी करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 15:17 IST

शरीराच्या प्रायव्हेट पार्टसवर नेहमी  वेगवेगळ्या कारणांमुळे इन्फेक्शन होत असतं.

शरीराच्या प्रायव्हेट  पार्टसवर नेहमी  वेगवेगळ्या कारणांमुळे इन्फेक्शन होत असतं. कारण रोजच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाला स्वतःच्या शरीराकडे फारस लक्ष द्यायला मिळत नाही. त्याचा नकारात्मक परीणाम आरोग्यावर होत असतो. बदलत्या वातावरणात घाम येण्याचे प्रमाण वाढतं. काख, मांड्या यांमध्ये खाज येऊन वेगवेगळ्या त्वचेशी निगडीत आजारांची लागण होते. आणि अशा प्रकारच्या आजारांजा धोका असा की यामध्ये ईन्फेक्शन झालेल्या भागानंतर संपुर्ण शरीरात ते इन्फेक्शन पसरतं. त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते. 

खाज जर वारंवार येत असेल तर ते वजायनल पेन किंवा लिव्हरचे दुखणेही असू शकते.  स्किनची समस्या बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळे उद्भवते.  ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. शरीराला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा रुक्ष होऊन खाजेची समस्या सुरू होते.  फोड आणि पुरळ येऊन खाज सुरू होते. 

 (Image credit- her world)

लघवी केल्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ न केल्यास इन्फेक्शन होऊन खाज येते. स्त्री-पुरुषांच्या डोक्यात उवा झाल्यानेही खाज होते. जीने चढताना किंवा रस्त्यावरून चालताना तापमान अधिक असेल तरी खाज सुरू होते. सुरुवातीला खाजेचे प्रमाण कमी असते. जोराने खाजवल्याने त्वचा लाल होते. त्वचेवर पुरळ उठते. कंबर, छाती, मांड्या आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या उद्भवते. तसेच बर्थ कंट्रोलसाठी वापरली जाणारी उत्पादनं ही त्या भागावर इन्फेक्शन होण्याची कारणं ठरु शकतात. अनेकदा शरीर संबंधांदरम्यान योग्य ती काळजी न घेतल्याने आजारांचा धोका वाढतो. 

त्वचेवरील खाजेपासून वाचण्यासाठी काही खास टीप्स 

त्वचा मऊ राखण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा.अँटी इचिंग  क्रीमचा वापर करावा.कडुलिंबाची पाने उकळून गाळून त्याने अंघोळ केल्यास खाज कमी होते.वाढलेल्या नखांनी इन्फेक्शन झालेल्या भागांना खाजवू नका.सकाळ-संध्याकाळी नियमीत अंघोळ करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने अलर्जी रोखणारे औषध घ्यावे.साबण, डिटर्जंट परफ्यूम डॉक्टरांच्या सल्ला घेऊन वापरा.चिंच, लोणचे, लिंबू, टोमॅटो, तेल, लाल मिरची, चहा यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे..

टॅग्स :WomenमहिलाSkin Care Tipsत्वचेची काळजी