(Image credit-NASN BLOG)

बदलत्या जीवनशैलीत वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या उद्वतात. वाढत्या वयात  हाडं कमकुवत होतात. आपल्या शरीरात हाडांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे संतुलन न राहिल्याने हाडांशी संबंधीत आजार होतात.  वयाची 30 वर्ष ओलांडल्यानंतर बोन डेंन्सिटी म्हणजेच हाडांची घनता कमी होते. ऑस्टोपोरियोसिस यामुळे हाडं तुटतात. हाडांना तुटण्यापासून वाचवण्यासाठी  दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. तसंच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करावा. 

शरीरातील हाड ही  स्केलेटन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन यांपासून तयार झालेले असतात. तसंच या घटकांपासून शरीराला पोषण मिळतं.  जन्म झाल्यानंतर जसजसं वय वाढत जातं तसतसं हाडांचा विकास होत जातो. आणि म्हातारपणाकडे  येत असताना हाडं तुटण्याचा  धोका असतो.

हाडरोगतज्ञांच्या सल्ल्यनुसार वयाच्या ३० वर्षापर्यंत हाडांचा विकास होतो.  ३० ते ३५ वयात बोन डेंन्सीटी  जास्त असते. ३५ वय पार केल्यानंतर हाडं कमकुवत व्हायला सुरूवात होते. आणि ५० वयानंतर महिला तसेच पुरूषांमध्ये हाड तुटण्याचा धोका असतो. कारण या वयात शरीरातील हाडांमधून व्हिटामीन डी आणि कॅल्शियम कमी होत असल्यामुळे या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ऑस्टोपोरियोसिस हा हाडांशी संबंधीत आजार उद्भवतो. धुम्रपान, आणि हार्मोन्सच्या बदलामुळे ही समस्या वाढीस लागते. वाढत्या वयात या आजारांपासून बचाव करायचा असेल तर आहारात काही पदार्थांचे सेवन करणं आवश्यक आहे. जाणून घ्या कोणत्या पदार्थांनी शरीरातील हाडं निरोगी राहतील.


 (Image credit- www.prevention.com)

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. पालक, कोबी, आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांमध्ये पोटॅशिअम आणि मग्‍नेशिअमही असते.  यांचं सेवन केल्यास हाडांसाठी फायदेशीर ठरतं 

ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या व्यक्तींनी  मनुके खाणे गरजेचे आहे. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते. जे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. 

बदामामध्ये कॅल्शिअम असते. तसेच प्रथिनेही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवत नाही. तसेच स्मरणशक्‍ती वाढवण्यासाठीही बदाम अत्यंत उपयुक्त आहार आहे. रोज सकाळी प्रथिनयुक्‍त बदामांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

 दूध हे जास्त कॅल्शियमयुक्‍त आहारात गणले जाते. बालपणापासून अगदी प्रौढ होईपर्यंत हाडांच्या बळकटीसाठी दुधाची आवश्यकता असते. एक कप दुधात २८० मिलिग्रॅम कॅल्शिअम असते. व्यक्‍तीची कॅल्शियमची दैनंदिन गरज आहे. त्यामुळे दुधाचे सेवन करणं गरजेचं आहे.

Web Title: How to prevent from bones disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.