एका दिवसात कलिंगड किती आणि कधी खायला हवं? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 08:06 PM2021-04-09T20:06:40+5:302021-04-09T20:19:30+5:30

अतिप्रमाणात  कलिंगड खाल्ल्याने शरीरात पाण्याचा अभाव दूर होतो. परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ले तर यामुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात पाणी तयार होते.

How much watermelon should you eat in a day know side effects of eating too much watermelon | एका दिवसात कलिंगड किती आणि कधी खायला हवं? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् नुकसान

एका दिवसात कलिंगड किती आणि कधी खायला हवं? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् नुकसान

googlenewsNext

उन्हाळा सुरू झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या सीजनल भाज्या आणि फळं दिसायला सुरूवात झाली आहे. गरमीच्या वातावरणात लोक जास्तीत दाक्ष, संत्री आणि कलिंगड खात आहेत. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. पण गरजेपेक्षा जास्त कलिंगड  खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

एका दिवसाला विशिष्ट प्रमाणातच कलिंगडाचं  सेवन करायला हवं म्हणून आज आम्ही तुम्हाला  कलिंगडाचं अतिसेवन केल्यास शरीराला कसं नुकसान पोहोतचं आणि  दिवसाला किती कलिंगड खायला हवं याबाबत सांगणार आहोत. 

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

डायट मंत्र क्लिनिकच्या डायटीशियन कामिनी कुमारी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना सांगितले की, एका दिवसात आपण 100 ते 200 ग्रॅम कलिंगड खायला हवे. कोणत्याही वेळी  कलिंगड खाणे टाळा. दिवसभर कलिंगड खाणे देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. बरेच लोक दुपारी जेवणानंतर कलिंगड खातात, जे अगदी चुकीचे आहे. नाष्त्यानंतर काही वेळानं  किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून नेहमी टरबूज खा. हे आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते 

डायटिशियन कामिनी यांच्या मते कलिंगडामध्ये भरपूर पाणी असते. पण त्यात फ्रुक्टोज देखील आहे. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कलिंगड खाल्ले तर तुमच्या शरीरात फ्रुक्टोज जास्त जाऊ शकते. ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. म्हणून मधुमेह रूग्णांनी कलिंगड मर्यादित प्रमाणातच घ्यावा.

नवीन टुथब्रश घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, तरच पांढरेशुभ्र राहतील दात, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कलिंगडात पाणी तसेच फायबर असते. जर आपण दिवसभर फक्त कलिंगड खाल्ले तर आपल्या शरीरात फायबरचे प्रमाण वाढेल. ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. अतिप्रमाणात  कलिंगड खाल्ल्याने शरीरात पाण्याचा अभाव दूर होतो. परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ले तर यामुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात पाणी तयार होते, ज्यामुळे रक्त पातळ होऊ शकते किंवा रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते. रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हात-पायांना सूज येण्याची शक्यता असते.

कलिंगड विकत घेताना हे लक्षात ठेवा

 कलिंगड लवकर पिकवण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजन शरीरात गेल्यानंतर आरोग्याचं नुकसान होतं. कलिंगडाचा रंग लाल दिसण्यासाठी त्यात क्रोमेट, मेथनॉल यलो, सुडान रेड या केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे फुड पॉईजनिंग होण्याची शक्यता असते. अनेकदा कलिंगड कार्बाईडचा वापर करून पिकवलं जातं. जे लिव्हर आणि किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं. यांसारखे आजार उद्भवतात. तसंच पचनक्रिया खराब होऊन पोटाचे विकार उद्भवतात.

अशी करा तपासणी :

कलिंगडावर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची पावडर दिसत असेल तर ती धूळ असल्याचा आभास सुद्धा होऊ शकतो. पण कार्बाइडमुळे कलिंगडावर पावडर असू शकते. त्यामुळे फळं जलद गतीने पिकतात. त्यासाठी कलिंगड कापण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

साधारणपणे इंजेक्शन दिलेले कलिंगड जास्त लाल दिसतात. कापल्यानंतर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त गोडवा आणि लाल रंग जाणवत असेल तर कलिंगड केमिकल्सयुक्त असू शकतं. इंजेक्शन दिलेल्या कलिंगडाच्या आत एक मोठी भेग किंवा खड्डा असतो. जर तुम्हाला कलिंगड खाताना जीभेला नेहमीपेक्षा वेगळी चव वाटत असेल किंवा औषधांप्रमाणे चव असेल तर असे कलिंगडाचे काप खाऊ नका. त्यामुळे आरोग्याला धोका असू शकतो. 

बाजारातून कलिंगड आणल्यानंतर २ ते ३ दिवस असेच राहू द्या. या दिवसांमध्ये कलिंगड खराब झालं नाही तर ते खाण्यास योग्य आहे. जर या दिवसांमध्ये कलिंगडातून पांढरं पाणी बाहेर येत असेल तर तुम्हाला ओळखता येईल की, कलिंगडावर केमिकल्सचा वापर केला आहे. जर असं झालं नाही तर २ ते ३ दिवसांनंतर तुम्ही कलिंगड कापून खाऊ शकता.

Web Title: How much watermelon should you eat in a day know side effects of eating too much watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.