तुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का?; अशी पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:39 PM2019-09-21T16:39:31+5:302019-09-21T16:46:52+5:30

नाकामध्ये बोट घालणं एक सामान्य क्रिया आहे असा अनेकांचा गैरसमज असतो. तुम्ही स्वतः किंवा आजूबाजूच्या लोकांना असं करताना पाहत असाल. अनेकजण असं नाक स्वच्छ करण्यासाठी करतात.

How harmful is it to pick your nose | तुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का?; अशी पडू शकते महागात

तुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का?; अशी पडू शकते महागात

googlenewsNext

नाकामध्ये बोट घालणं एक सामान्य क्रिया आहे असा अनेकांचा गैरसमज असतो. तुम्ही स्वतः किंवा आजूबाजूच्या लोकांना असं करताना पाहत असाल. अनेकजण असं नाक स्वच्छ करण्यासाठी करतात. याव्यतिरिक्त अनेकजण बोअर जाल्यानंतर किंवा नर्वस झाल्यानंतर असं करतात. काही लोकांना तर नाकात बोटं घालण्याची सवयचं होते. थोडासा जरी वेळ मिळाला तरीही त्यांचे बोट थेट नाकात जातं. या सवीला 'Rhinotillexomania' असं म्हटलं जातं. 

तुम्हाला माहीत आहे का? गरजेपेक्षा जास्त नाकात बोट घालणं आरोग्यासाठी घातक ठरतं. याच कारणामुळे इन्फेक्शन, आजार पसरणं, नोजल कॅव्हिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नाकातून रक्त येणं किंवा जखम होणं यांमुळे  सेप्टमला नुकसान होण्याचा धोका असतो. जाणून घेऊया नाकामध्ये बोट घातल्याने कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याबाबत... 

बॅक्टेरिअल इन्फेक्शन

नाकामध्ये बोट घालणं ही वाईट सवय आहे. एका रिसर्चनुसार, नाकामध्ये बोट घालणं तणाव आणि चिंता यांच्याशी निगडीत विषय आहे. जेव्हा तुम्ही असं काही करता त्यावेळी स्टॅफीलोकोक्क्स ऑरियस यांसारखे बॅक्टेरिया नाकामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे नाकात बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका संभवतो. 

जखम होऊ शकते 

नाकामध्ये बोट घातल्याने आतमध्ये जखम होऊ शकते. अनेकदा नाकात असलेले केस तुटतात. ज्यामुळे नाकाच्या आतील भागात सूज येते. तसेच अनेकदा जखमही होऊ शकते. 

नॅसल सेप्टमला नुकसान 

नाकाच्या आतमध्ये सतत बोट घातल्याने तुमच्या नॅसल सेप्टमला अधिक नुकसान पोहोचू शकतं. कारण असं केल्याने सेप्टम तुटू शकतं. 

रक्त येऊ शकतं 

नाकामध्ये सतत बोट घातलण्याच्या सवयीमुळे रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचू शकतं. ज्यामुळे कधी कधी त्यातून रक्त येतं. ज्या व्यक्ती सतत नाकामध्ये बोटं घालतात. त्यांचं नाकही हळूहळू सेन्सिटिव्ह होतं. 

नाकात बोट घालणं का टाळावं? 

कदाचित तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, नातामधील जो मळ तुम्ही फ्री टाइममध्ये काढत बसता, त्याला बूगर्स म्हणजेच, सुकलेला कफ असं म्हटलं जातं. हेच बूगर्स अनेकदा फायदेशीर ठरतात. ज्यावेळी तुम्ही बाहेर असता त्यावेळी धूळीचे कण, वायरस ट्रॅप करण्यासाठी मदत करतात. म्हणजेच, जेव्हा वायरस किंवा धूळीचे कण नाकाद्वारे शरीरात जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी हे बूगर्स त्यांना रोखण्याचं काम करतात. त्यामुळे बॅक्टेरिया फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाहीत. 

स्वच्छता गरजेची

बूगर्स आपल्या आरोग्यासाठी चांगले असले तरिही नाकाची स्वच्छता करणं गरजेचं असतं. कारण काही वेळानंतर तिथे अनेक धुळीचे कण जमा होतात. जर तुम्ही स्वच्छ केले नाहीतर ते नाकाच्या आत किंवा घशामध्ये जाऊ शकतात. पण लक्षात ठेवा हे स्वच्छ करताना बोटाचा वापर न करता टिश्यू पेपरचा वापर करा. त्याव्यतिरिक्त नाक स्वच्छ करण्यासाठी ड्रॉप किंवा स्प्रेचा वापर करू शकता. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: How harmful is it to pick your nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.