कडुलिंबाने कोरोनावर मात करता येणार?; भारतीय डॉक्टर, तज्ज्ञांकडून चाचणीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:11 PM2020-08-25T15:11:04+5:302020-08-25T16:03:34+5:30

भारतीय डॉक्टरांची टीम आणि भारतीय फार्मा कंपनी ऑल इंडीया इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद मिळून यावर काम करत आहे. 

How effective neem in corona virus infection and covid 19 aiia doing research | कडुलिंबाने कोरोनावर मात करता येणार?; भारतीय डॉक्टर, तज्ज्ञांकडून चाचणीला सुरूवात

कडुलिंबाने कोरोनावर मात करता येणार?; भारतीय डॉक्टर, तज्ज्ञांकडून चाचणीला सुरूवात

Next

कडुलिंबात अनेक औषधी  गुणधर्म आहेत. पुर्वापारपासून कडुलिंबाचा वापर अनेक आजारांना बरं करण्यासाठी केला जात आहे. सामान्य फ्लू, व्हायरल, फंगल इंन्फेक्शन दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचे सेवन फायदेशीर असते. कोरोना व्हायरचा प्रभाव कमी करण्यासाठी कडुलिंब किती फायदेशीर ठरतो. याबाबत तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. भारतीय डॉक्टरांची टीम आणि भारतीय फार्मा कंपनी ऑल इंडीया इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद मिळून यावर काम करत आहे. 

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद यांसह भारतीय औषध निर्मीती कंपनी निसर्गद्वारे डॉक्टर्स आणि हेल्थ एक्सपर्ट्सची एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम औषधी गुणांचा कोरोनावर कसा प्रभाव पडतो याबाबत संशोधन करणार आहे. वैज्ञानिक डॉक्टरांची टीम मिळून  हरियाणातील फरिदाबाद शहरातील  इएसआयसी रुग्णालयात कोरोनाचा रुग्णावर कडुलिंबाचा कसा परिणाम होतो याचे परिक्षण करणार आहेत. 

कडुलिंबाने कोणत्या समस्यांपासून लांब  राहता येतं?

कडुलिंब ही एक भारतीय जडीबुडी आहे. औषधी गुणधर्म लक्षात घेता भारताला या औषधी वनस्पतीचे पेटंटही देण्यात आलं आहे. . या झाडाची पानं, फळं आणि मुळांचेही अनेक औषधी गुणधर्म आहेत. ही चवीला कडू असली तरिही याचे फायदे मात्र आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कडुलिंब अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुम्हीही उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या स्किन अ‍ॅलर्जी, खाज किंवा रॅशेज यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर कडुलिंबाच्या वापराने सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.  

मलेरिया झाल्याने कडुलिंबाच्या झाडाची साल पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा प्यायल्याने फायदा होतो. कडुलिंबाच्या खोडामध्ये खोकला, बद्धकोष्ट आणि पोटोच्या समस्या दूर करणारे गुणधर्म असतात. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना आणि छातीमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुलिंबाचं तेल मदत करतं. कफ, खोकला आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी कडुनिंबाचा वापर होतो. श्वसन विकारांवर कडुनिंब दीर्घकाळापर्यंत आराम देतं.

पोटात जंत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्श होतं. कडुलिंबाची पाने खूप उपायकारी असतात. कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये थोडे मध आणि काळी मिरी पावडर घालून घेतल्यास पोटाचे सर्व आजार बरे होतात. कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून सुटका होते.

कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप  लाभदायक आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात. हिरड्या सुजणं, रक्त बाहेर येणं असा त्रास कमी होतो.

हे पण वाचा-

जीवघेण्या कॅन्सरपासून बचावासाठी मुळ्याचं सेवन फायद्याचं; वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडातील तज्ज्ञांचा दावा

दिलासादायक! ब्रेस्ट मिल्कने कोरोनापासून बचाव होणार; रुग्णांना दुधाचे आईस क्यूब दिले जाणार, तज्ज्ञांचा दावा

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

Web Title: How effective neem in corona virus infection and covid 19 aiia doing research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.