जीवघेण्या कॅन्सरपासून बचावासाठी मुळ्याचं सेवन फायद्याचं; वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडातील तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:04 PM2020-08-25T14:04:56+5:302020-08-25T14:59:36+5:30

मुळ्याचे सेवन रोज केल्याने फ्रि रेडिकल्स कमी प्रमाणात तयार होतात.

Radish is beneficial in cancer the world cancer research fund said | जीवघेण्या कॅन्सरपासून बचावासाठी मुळ्याचं सेवन फायद्याचं; वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडातील तज्ज्ञांचा दावा

जीवघेण्या कॅन्सरपासून बचावासाठी मुळ्याचं सेवन फायद्याचं; वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडातील तज्ज्ञांचा दावा

Next

मुळा पोट आणि लिव्हरसाठी खूप फायदेशीर ठरतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी मुळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. रक्ताला शुद्ध करण्यासाठी मुळ्याचे सेवन करणं लाभदायक ठरतं. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार मुळ्याचे सेवन रोज केल्यानं कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. द वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड (The World Cancer Research Fund) आणि अमेरिकन इंस्टीट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चनं हा दावा केला आहे. या संशोधनातून दिसून आलं की मुळ्याचे सेवन रोज केल्याने फ्रि रेडिकल्स कमी प्रमाणात तयार होतात. यामुळे फुफ्फुसं आणि पोटाचा कॅन्सर होण्याची जोखीम कमी होते. मुळा एक डिटॉक्सीफायर आहे. त्यात व्हिटामीन सी, फोलिक आणि एंथ्रोसाइनिन असते. ज्यामुळे कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. 

मुळ्यात आयसोथायोसाईनेट आणि ग्लूकोसाइनोलेटचं प्रमाण जास्त असतं. यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखता येऊ शकते. याशिवाय कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमताही यात असते. सिनिग्रिन नावाच्या एंटीऑक्सिडेंट्स काही प्रमाणही मुळ्यात असतात  त्यामुळे फ्री रेडिकल्सच्या उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तज्ज्ञ एडम चॅपमॅन यांनी सांगितले की फ्री रेडिकल्स आरोग्यासाठी, शरीरातील पेशींसाठी नुकसानकारक  ठरतात. फ्री रेडिकल्स प्रमाणाच्या बाहेर निर्माण झाल्यास ट्यूमरचा धोका वाढतो. 

या अभ्यासात सामिल झालेल्या ५००० लोकांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी आपल्या  आहारात मुळ्याचा समावेश केला होता.  काही लोकांना नेहमीचं खाणं पिण सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. ४ महिन्यांनंतर आहारात मुळ्याचा समावेश करत असलेल्या लोकांच्या शरीरात फ्री रेडिकल्स कमी प्रमाणात दिसून आले. तसंच फुफ्फुसं आणि पोटाचा कॅन्सर होण्याची जोखिम कमी झाली होती. 

मुळ्याचे शरीराला होणारे इतर फायदे

रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.

 सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय म्हणून मुळ्याचा वापर होतो. मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

 मुळ्याच्या ताज्या पानांच्या रसाचा उपयोग मुतखड्यावरही परिणामकारक ठरतो.

मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांच्या रसात अधिक गुणधर्म असतात. ही पाने पचण्यास हलकी असतात. परंतु पाने उष्ण असतात, त्यामुळे बऱ्याचदा पित्त वाढण्याची शक्यता असते. म्हणून मुळ्याच्या पानांची भाजी खाणे फायदेशीर ठरते.

 किडनीच्या विविध विकारांवरही मुळा खाणे हे औषधी ठरते.

मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते याचे सेवन केल्याने भूक भागवण्यासही मदत होते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

कावीळीवरही मुळा खाणे फायदेशीर ठरते. कावीळ झाली असल्यास अनोशापोटी मुळा खाल्यास कावीळ पूर्णत: बरी होते.

तापावरही मुळ्याची भाजी अत्यंत गुणकारक ठरते. मुळ्यामध्ये ज्वरनाशक गुणधर्म असतात. 

 मुळ्याचा आहारात समावेश केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत होते.

 डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा खाणे उपयुक्त आहे.

मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो.

 त्वचेसाठीही मुळा आरोग्यवर्धक ठरतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिस्न दूर होऊल त्वचा उजळण्यास मदत होते. 

मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते.

हे पण वाचा-

दिलासादायक! ब्रेस्ट मिल्कने कोरोनापासून बचाव होणार; रुग्णांना दुधाचे आईस क्यूब दिले जाणार, तज्ज्ञांचा दावा

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

सुका खोकला आणि ओला खोकला यातील फरक आणि सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

Web Title: Radish is beneficial in cancer the world cancer research fund said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.