Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:08 AM2020-08-24T00:08:05+5:302020-08-24T07:10:34+5:30

केंद्राकडून परवाना फक्त उत्पादन, साठवणुकीसाठी

Coronavirus vaccine in 73 days and not free; Explanation of Serum Institute | Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनिसा संयुक्तपणे विकसित करीत असलेली कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस भारतीयांना ७३ दिवसांत व मोफत उपलब्ध होणार नाही असे सिरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. तशा प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा कंपनीने इन्कार केला आहे. लसीचे उत्पादन व साठवणूक यापुरताच केंद्र्र सरकारने आम्हाला परवाना दिला असल्याचे या कंपनीने सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की, कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू असून, ते प्रयोग यशस्वी ठरल्यास तसे आम्ही सर्वांना कळविणारच आहोत. त्यानंतरच लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल. कोविशिल्डच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीशी करार केला आहे.

कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील चाचण्या भारतामध्ये करण्यास केंद्र्र सरकारने परवानगी दिली आहे. या चाचण्यांमध्ये १६०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. स्वदेशात बनत असलेल्या लसींपैकी एका लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू आहे. ही लस विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ शथीर्चे प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले. गाझियाबाद येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते.

वर्षअखेरपर्यंत लस शक्य
भारत या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याची शक्यता आहे, असे केंद्र्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

माहिती देण्यासाठी वेबसाईट
देश व विदेशामध्ये कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासंदर्भातील संशोधनाच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था लवकरच एक वेबसाईट सुरू करणार आहे. या वेबसाईटवर इंग्रजी, तसेच प्रादेशिक भाषांमध्ये ही माहिती देण्यात येईल.

Web Title: Coronavirus vaccine in 73 days and not free; Explanation of Serum Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.