शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

क्षय झालेल्या रुग्णांची काळजी तुम्ही कशी घ्याल?, आजाराविषयी समाजात गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:05 IST

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने २०३० तर भारताने २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटनाचा निर्धार केला आहे. परिणामी, अजूनही समाजात या आजाराविषयी गैरसमज आहेत. हे दूर सारुन खऱ्या अर्थाने क्षय रुग्णांची काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रुग्णांना तीन हजार रुपयेकेंद्र सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सर्व नोंदणीकृत आणि अधिसूचित क्षय रुग्णांना दरमहा ५०० रुपये देते. हे पाठबळ उपचार कालावधीपर्यंत प्रदान केले जाते. जरी उपचार दोन वर्षांपर्यंत वाढले तरीही दिले जातात.  मुळात रुग्णांना पोषक आहार मिळावा यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. 

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.

आहाराचे किट ही दिले जातेनिक्षय मित्रांनी क्षय रुग्णांना मोठ्या व्यक्तीकरिता- नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू, तीन किलो, डाळ दीड किलो, तेल २५० ग्रॅम, शेंगदाणा, दूध, पावडर एक किलो तर लहान बालकांना नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू दोन किलो, डाळ एक किलो, तेल १५० ग्रॅम, शेंगदाणा, दूध पावडर ७५० ग्रॅम याप्रमाणे पोषण आहार किट दरमहा द्यावयाचे आहे. या पोषण आहाराचे उद्दिष्ट रुग्णाचे पोषण योग्य पद्धतीने होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा होय. अशाप्रकारे रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. 

प्रत्येक रुग्ण दत्तक प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानांतर्गत निक्षय मित्र ही योजना देशभरात कार्यान्वित करण्यात आली आहे. क्षयरोग बाधितांचा पोषक आहार, तपासण्यांचा खर्च, उपचाराकरिता खर्च किंवा गंभीर आजारातून बरे होण्यासाठी पुनर्वसन करण्याकरिता निक्षय मित्र मदत करू शकतात. निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षय बाधितांना मदत करतो. किमान सहा ते तीन वर्ष क्षय बाधितांना मदत करता येते.

क्षयरोगाचे प्रकार आणि लक्षणे ढोबळमानाने क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत. फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो   एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस याचा परिणाम फुफ्फुसांसोबतच इतर अवयवांवर ही होतो.

कशी काळजी घ्यावी? क्षयरोगाचे उपचार दीर्घकालीन असतात. या कालावधीत अनेकदा रुग्ण व कुटुंबीय यांना सामाजिक,आर्थिक आणि मानसिक ताणातून जावे लागते. त्यामुळे क्षयरुग्णांचे उपचार पूर्ण करण्यावर अधिक भर देत, समाजातील गैरसमज दूर सारत या कुटुंबीयांचेही पाठबळ वाढविल्यास क्षय रोगावर नियंत्रण मिळविणे आणि प्रतिबंध करणे सोपे जाईल,असे मत श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू देवस्थळी यांनी व्यक्त केले आहे.

  प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियान या योजनेंतर्गत समाजातील विविध घटक म्हणजेच दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सोसायट्या, औद्योगिक तसेच राजकीय संस्था या मदत करू शकतात.   अधिकाधिक क्षय रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिकेसह अन्य स्तरातून करण्यात येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य