How to check immunity weak or strong know signs of weakened immune system | कोरोनासोबत जगताना आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे की कमकुवत कसं ओळखाल?

कोरोनासोबत जगताना आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे की कमकुवत कसं ओळखाल?

 प्रत्येकाच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कशी आहे. यावर आजारांचा सामना करता येणार की नाही हे अलंबून असते. सध्याच्या माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमी किंवा कमकुवत असेल तर कोरोनासारखे विषाणू आणि इतर आजारांपासून बचाव करणं कठीण होऊ शकतं. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकजण योग्य आहार घेण्याच्या प्रयत्नात आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना सौम्य स्वरुपाची लक्षणं किंवा एलर्जी उद्भवल्यास तीव्र त्रास होतो. शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता कमी असल्यास शरीरात काही लक्षणं दिसून येतात. 

लक्षणं

कँडीडा टेस्ट पॉजिटिव्ह येणं

यूटीआईच्या समस्या उद्भवणे

अतिसार

हिरड्यांना सुज येणं

एलर्जी

सर्दी, खोकला

ताप येणं

शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स असतात. खाताना, पिताना किंवा श्वास घेताना आपण हानीकारक तत्व शरीरात घेत असतो. त्यामुळे आपण आजारी पडतो.ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते. त्यांचा बाहेरील संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. टॉक्सिन्स बक्टीरिया, वायरस, फंगस, पॅरासाइट तसंच दुसरे नुकसानकारक पदार्थ असू शकतात.  रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास हेपेटाइटिस, लंग्स इनफेक्शन यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. 

व्हिटामीन डी मुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता असते. याशिवाय थकवा, सतत आळस येणं, जखम बरी व्हायला वेळ लागणं, जास्त झोप येणं, नैराश्य येणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळ दिसणं, अशी लक्षणं दिसत असल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे. याशिवाय वातावरणातील बदलांमुळे शरीरात अनेक बदल होत असतात. 

कोरोनाकाळात काम,अभ्यास सगळ्याच गोष्टी घरात राहून केल्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे जेवणाच्या आणि नाष्त्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. कधीही मुड झाला तेव्हा लोक जेवतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

लॉकडाऊनमुळे अनेकांना जास्त आळस जास्त प्रमाणात यायला सुरूवात झाली आहे.  जीमला  जाणं किंवा घरी व्यायाम करणं याकडे फारसं लक्ष न दिल्यामुळे लोकांना रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने आजारांचा सामना करावा लागत आहे. म्हणून घरी असताना शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे. अन्यथा नकळतपणे लठ्ठपणाचे शिकार व्हावं लागू शकतं.

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How to check immunity weak or strong know signs of weakened immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.