भरपूर पाणी प्यावंच, पण कधी किती प्यावं? होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 09:43 AM2024-04-08T09:43:16+5:302024-04-08T09:43:38+5:30

Water Drinking Tips : खासकरून उन्हाळ्यात पाण्याचं योग्यपणे सेवन करणं फार महत्वाचं आहे. कारण पाण्यापासून शरीरात शेकडो फायदे मिळतात.

Homeopathy Dr Vandana told how much water to drink, know right way and time to drink | भरपूर पाणी प्यावंच, पण कधी किती प्यावं? होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

भरपूर पाणी प्यावंच, पण कधी किती प्यावं? होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Water Drinking Tips : आपल्या शरीराचा 70 टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला असतो. पाणी हे जीवन आहे आणि त्याशिवाय जीवनाचा विचार करता येत नाही. शरीरात जर पाणी कमी झालं किंवा तुम्ही पाणी कमी प्यायले तर वेगवेगळ्या समस्या होतात. खासकरून उन्हाळ्यात पाण्याचं योग्यपणे सेवन करणं फार महत्वाचं आहे. कारण पाण्यापासून शरीरात शेकडो फायदे मिळतात.

शरीरात कोणत्याही कारणाने पाणी कमी झालं तर शरीराचं कामकाज बिघडू लागतं. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. अशात होमिओपॅथिक एक्सपर्ट डॉ. वंदना गुलाटी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की, दिवसात कधी-कधी पाणी प्यावं.

कधी आणि किती पाणी प्यावे?

सकाळी रिकाम्यापोटी एक ग्लास पाणी

जेवणाआधी 1 ग्लास पाणी

जेवण केल्यावर कमीत कमी 45 मिनिटांनंतर पाणी प्यावे

दिवसभरातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे

काय खाल्ल्यावर पिऊ नये पाणी?

फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

एक्सरसाइज केल्यावर लगेच पाणी पिऊ नये

फ्राय फूड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

शेंगदाणे खाल्ल्यावर पाणी पिऊ नये

गरम दूध-चहा प्यायल्यावर पाणी पिऊ नये

पाणी पिण्याचे फायदे

पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि टॉक्सिन शरीरातून बाहेर पडतात. तसेच तुम्हाला एनर्जी  मिळते आणि तुम्ही दिवसभर रिफ्रेश राहता. त्यासोबतच वजन कमी करण्यासही पाण्याने मदत मिळते. पोटातील अल्सर, गॅसपासूनही बचाव होतो. सोबतच शरीर थंड ठेवण्यासही पाण्याने मदत मिळते. भरपूर पाणी प्यायल्याने किडनी होत नाही आणि लिव्हरही साफ राहतं.
 

Web Title: Homeopathy Dr Vandana told how much water to drink, know right way and time to drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.