शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दिवाळीत फराळ करताना, फटाके वाजवताना भाजलं तर परिणाम गंभीर होण्याआधी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:26 IST

स्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊयात भाजल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करु शकता.

प्रत्येकाच्या घरात आता दिवाळीची गडबड सुरु असते.या गोंधळामध्ये घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात फराळ तयार करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊयात भाजल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करु शकता.

कोरफड -भाजलेल्या ठिकाणी कोरफड लावल्यामुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही, त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.

मध -सर्वांच्याच घरात उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे मध. मधेचा आयुर्वेदामध्ये विषेश महत्त्व प्रप्त आहे. खोकला असल्यास मधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात,.मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

सौम्य लव्हेंडर ऑइल -वेदना कमी करण्यासाठी हेही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. सौम्य लव्हेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील 'व्हिटॅमिन सी' आणि लव्हेंडर ऑइलमधील 'व्हिटॅमिन इ' एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण जखमेवर दिवसभर लावून ठेवावे.

केळ्याची साल -केळ हे फळ १२ महिने सर्वत्र उपलब्ध असते. केळ्याची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यास केळ्याची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

दही -दही देखील आपल्याला सर्रस उपलब्ध होतो. प्रत्येक घरामध्ये हे असतेच. भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल -जर तुमच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल असल्यास भाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो. थोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स