शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

संधिवात तरुण वयातही बळावू लागलाय, त्यावर 'हे' घरगुती उपाय करा अन्यथा होतील दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 5:05 PM

संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे.  संधिवातावरील घरगुती उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला...

हल्ली संधिवाताचा त्रास आता वयाच्या चाळीशीनंतर नाही तर काहींनी आधीही होऊ लागला आहे. शरीराची योग्य पद्धतीने निगा राखली नाही की, अशा त्रासांना फार लहान वयातच अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे.  संधिवातावरील घरगुती उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला...

संधिवात म्हणजे काय?‘संधिवात’ या शब्दाची फोड केली तर संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे.. त्यामुळे सांधेदुखी यालाच ‘संधिवात’ असे म्हणतात. ज्या ठिकाणी दोन किंवा त्याहून अधिक हाडे एकत्र येत स्नायू आणि मांसपेशी जोडल्या जातात अशा भागाला आपण सांधा म्हणतो. संधिवातामध्ये सांध्याला सूज येऊ लागते. सूजलेला भाग खूप दुखू लागतो. मॉर्डन सायन्समध्ये अशा दुखण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला आथ्ररायटिस किंवा सोरायटिक असेही म्हणतात.

संधिवातावर अनेक उपचारपद्धती आहेत.पण तुम्ही घरीच योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला त्यापासून थोडा आराम मिळू शकेल.

शरीराची हालचाल (Maintain Flexibility)संधिवातामुळे तुमचे सांधे दुखत असले तरी देखील तुम्हाला त्यांची हालचाल राखणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला संधीवातापासून सुटका हवी असेल तर तुम्ही नियमित थोडा का असेना व्यायाम करायला सुरुवात करा. शक्य असेल तितका व्यायाम तुमच्या सांधेदुखीला कमी करण्यास मदत करु शकतो. तुमचे अंग दुखते म्हणून तुम्ही तसेच पडून राहात असाल तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन चालणे, धावणे, सूर्यनमस्कार काही सोपी आसने नक्की करुन पाहा.

योग्य आणि पोषक आहार (Nutritious & Proper Diet)संधिवातासाठी कारणीभूत असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वाढते वजन. त्यासाठी कारणीभूत म्हणजे तुमचा आहार. तुमच्या शरीरात प्रोटीनयुक्त आहार जाणे फारच गरजेचे असते. प्रोटीन कशातून मिळते असा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही दूध, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांचा अधिकाधिक समावेश तुमच्या आहारात करायला हवा.

हळदीचा समावेश (Turmeric In Diet)हळदीमधील नैसर्गिक घटक हे शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच संधिवात असलेल्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा समावेश करावा असे म्हटले जाते. भारतीय जेवणामध्ये हळद ही अगदी हमखास वापरली जाते. पण तरीही त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर चिमूटभर हळदीचा उपयोग तरी करा. 

आल्याचा करा वापरकिचनमध्ये अगदी हमखास असणारे आले हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यामधील दाहनाशक घटक तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही आहारात आल्याचा समावेश करा. तुम्ही आल्याचा चहा करुन प्यायाला तरी चालेल. आले पाण्यात टाकून तुम्ही त्याही पाण्याचे सेवन करु शकता. पण त्याचे सेवनही प्रमाणात असू द्या. 

ग्रीन टी (Green Tea)संधिवात असणाऱ्यांनी त्यांचा आहार हा चांगला ठेवलाच पाहिजे पण आहारासोबत चयापचय क्रिया चांगली राहण्यासाठी अगदी हमखास घ्यायला हवी अशी गोष्ट म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते. तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचे सेवन करायला हवे.

लिंबू वर्गातील फळांचे सेवन (Consume Citrus Fruit)संधिवातासाठी आंबट फळांचे सेवन हे वर्ज्य आहे. पण ही फळ म्हणजे चिंच, बोरं पण तुम्ही मोसंबी, गोड संत्र, लिंबूपाणी अशा पदार्थांचे सेवन करु शकता. अनेकदा संधिवात असणाऱ्यांना आंबवलेले पदार्थ अजिबात खाऊन चालत नाहीत. हे पदार्थ म्हणजे इडली, डोसावगैरे

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स