शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

जाणून घ्या रक्तदान करण्याचे आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 7:40 PM

रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.

ठळक मुद्देरक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदेरक्तदानामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते

रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि चांगले शारीरिक आरोग्य लाभते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. रक्तदानाच्या प्रक्रियेमुळे रक्तदात्याचे शरीर आणि मन दोहोंवर चांगला प्रभाव होतो. रक्तदान करुन तुम्ही केवळ एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचे महान कार्य करत नाही तर ही प्रक्रिया तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे शरीर आणि मन दोहोंवर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. रक्तदानाच्या आरोग्यदायी फायद्यांपासून दुर्दैवानं बरेच जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होणे गरजेचं आहे. 18 ते 60 वर्ष या वयोमर्यादेतील कोणत्याही व्यक्ती रक्तदान करू शकतात. फक्त यासाठी केवळ काही महत्त्वपूर्ण बाबींसहीत निरोगी आयुष्य असणे आवश्यक आहे. पण समजा तुम्ही एखाद्या आजाराचा सामना करत असाल अथवा काही औषधोपचार सुरू असतील तर वैद्यकीय सल्ल्यानुसार रक्तदानाचा निर्णय घ्यावा. 

शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास महिलादेखील रक्तदान करू शकतात.  मात्र, मासिक पाळी, गरोदर महिला, बाळंतपणादरम्यान महिलांनी रक्तदान करू नये. 

रक्तदानाचे फायदे 1. हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकादेखील कमी होतो. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, असे म्हटले जाते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 

2. लाल रक्तपेशींमध्ये वाढ रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते. यादरम्यान, शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात. 

3. वजन घटते रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते. यादरम्यान, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते. पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही. रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे, वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रक्तदान करावे.

4. कॅन्सरचा धोका कमी  रक्तदान केल्यानं शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते.  यामुळे कॅन्सरचा धोकादेखील कमी होतो.  5. निरोगी आरोग्यरक्तदानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते, रक्तदाबही नियंत्रणात राहतो.  

6. आरोग्य तपासणीआरोग्यदायी फायद्यांव्यतिरिक्त रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते. यामुळे नियमित स्वरुपात रक्तदानामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्यरितीने देखभालही करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग