शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 13:22 IST

दूवर नकारात्मक परिणाम झाल्यास स्मृती, संवेदना यांवर नकारात्मक परिणाम होत असतो.  ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

आपल्याला शारीरिक स्थितीसोबतच मानसिक स्थितीचीसुद्धा काळजी घ्यायला हवी. आपले शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहे. शारीरिक स्थितीचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. मेंदू हा शरीरातील मह्त्वपूर्ण अवयव आहे. मेंदूवर नकारात्मक परिणाम झाल्यास स्मृती, संवेदना यांवर नकारात्मक परिणाम होत असतो.  ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

नाष्ता न करणं

अनेकदा  वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही नाष्ता करणं सोडून देता.  नाष्ता हा दिवसभर उर्जा देण्यासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्याासाठी फायदेशीर असतो. नाष्ता न केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम घडून येतो. शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर पौष्टिक आहार घेत नसाल तर आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूत ८० टक्के भागात पाणी असते. एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी मेंदूला पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी जास्तीत जास्त प्यायाला हवं. जेणेकरून शरीर डिहायड्रेड होणार नाही.

साखरेचं अतिसेवन

जास्त प्रमाणात साखर खाल्याने वेगवेगळ्या शारीरीक समस्या उद्भवण्याची शक्यता असतो. फक्त लठ्ठपणा आणि मधुमेह नाही तर साखरयुक्त पदार्थ खाल्याने मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. कारण साखरेच्या जास्त सेवनाने रक्तात पोषक तत्वांची कमतरता जाणवते. जास्त साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास स्मरणशक्ती तसचं विचार करण्याची क्षमता कमी होते.

उशीरा झोपणं

उशीरा झोपल्यानं आपली स्लिप सायकल डिस्टर्ब होते. उशीरा झोपल्याने सतत आजारी पडण्याची स्थिती उद्भवते. त्यामुळे हदयासंबंधी आजारांचा धोका असू शकतो. याशिवाय मेंदूवरही वाईट परिणाम घडून येतो. एका रिसर्चनुसार निरोगी जीवन जगण्यासाठी जास्त झोपणं किंवा कमी झोपणं हा प्रकार घातक ठरू शकतो. त्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उशीरा उठल्याने शरीरासोबतच मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त झोपल्यानं लठ्ठपणा,डोकेदुखी, कमेरेचे दुखणं उद्भवू शकते. 

मोबाईल जास्तवेळ वापरणं

अनेकांना टिव्ही मोबाईल बघत झोपण्याची सवय असते. कंम्प्यूटर किंवा मोबाईलचा वापर करतानाचा अनेकजण जेवतात. ही खूप वाईट सवय आहे. त्यामुळे ओव्हरइटींग किंवा डोळ्यांचं नुकसान होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या १ तास किंवा २ तास आधी मोबाईल स्वतःपासून लांब ठेवा. 

भारतात कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरूवात; आता 'हे' ५ उपाय संक्रमणापासून वाचवणार

CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स