भारतात कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरूवात; आता 'हे' ५ उपाय संक्रमणापासून वाचवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:49 AM2020-07-20T10:49:17+5:302020-07-20T11:17:21+5:30

भारतात कोरोनाच्या माहामारीचा प्रसार वेगाने होत आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत करोडो लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. तर लॉकडाऊन उठवल्यामुळे अनेक ठिकाणी संसर्गाचा धोका दुप्पटीने वाढला आहे. दरम्यान इंडियन मेडीकल असोशियेशन(IMA)ने कोरोना विषाणूंच्या सामुदायिक संसर्गाला भारतात सुरूवात झाल्याचे म्हटलं आहे.

भारतात दररोज हजारो रुग्ण समोर येत आहेत. मोठ्या शहरातून ग्रामीण भागात हे संक्रमण पसरण्याला वेळ लागणार नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे सामुदायिक संसर्गाचं सगळ्यात मोठं लक्षण असून ही अशी स्थिती आटोक्यात आणणं कठीण होऊ शकतं.

दिल्लीसारख्या शहरात सामुदायिक संसर्ग आटोक्यात आणण्यात यश आलं परंतू महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणं कठीण आहे.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग, हात धुणं यांसारख्या नियमांकडे लक्ष द्यायला हवं. एका अभ्यासानुसार मास्क वापरल्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका ३ टक्क्यांनी कमी होतो.

डोळ्यांची सुरक्षा केल्यास धोका ५.५ टक्क्यांनी कमी होतो. चेहरा झाकणं किंवा सोशल डिस्टेंसिंगचे पालन केल्याने कोरोनाच्या संसर्गापासून लांब राहता येऊ शकतं.

फेस मास्क, सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि गॉगल्सच्या वापराने तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकता. तज्ज्ञांनी आरोग्यविभागात कार्यरत असलेल्या कर्मचारीवर्गाला सर्जिकल मास्कऐवजी रेस्पिरेटर्स वापरण्याचा सल्ला दिला आहे.

हवेतून होत असलेल्या कोरोना संसर्गाबाबत तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला पत्राद्वारे माहिती दिली होती. हवेतून होणारा कोरोना संसर्ग हा संक्रमित व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून होतो. तसंच कोरोना रुग्णांच्या खोलीत व्हेंटिलेशन नसल्यास किंवा एसीचा वापर असल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. पण कोविड19 बाबत गाईड लाईन्सचं पालन करून तुम्ही कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून लांब राहू शकता.

यूके चे मंत्री सायमन क्लार्क यांनी गेल्या काही दिवसात दिलेल्या माहितीनुसार दोन मीटरचं अंतर ठेवूनच लोकांनी वावरायला हवं. एकमेकांशी बोलत असताना अंतर ठेवून सरकारी गाईडलाईन्सचं पालन करायला हवं.