शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे हळदीचा चहा, वाचा कसा तयार करायचा हा खास चहा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 12:54 IST

Turmeric Tea Benefits : हळदीमध्ये अ‍ॅंटीसेप्टिक आणि अ‍ॅंटी-बायोटिक्ससोबतच वोलेटाइल ऑईल, पोटॅशिअम, ओमेगो -३ फॅची अ‍ॅसिड, लायनोलेनिक अ‍ॅसिड, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट तसेच फायबर असतात.   

Turmeric Tea Benefits :  वजन वाढणे ही अलिकडे अनेकांसाठी मोठी गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. अशात ती ओळखून जर योग्य उपाय केले तर वजन कमी होण्यास लगेच मदत मिळेल. असाच एक घरगुती उपाय म्हणजे टर्मरिक टी (हळदीचा चहा). हळदीमध्ये अ‍ॅंटीसेप्टिक आणि अ‍ॅंटी-बायोटिक्ससोबतच वोलेटाइल ऑईल, पोटॅशिअम, ओमेगो -३ फॅची अ‍ॅसिड, लायनोलेनिक अ‍ॅसिड, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट तसेच फायबर असतात.   

केवळ एक मसाला म्हणूनच नाही तर हळद आरोग्य चांगलं ठेवण्याच्या कामासाठीही वापरलं जातं. एका नव्या शोधानुसार हे समोर आलं आहे की, हळदीच्या मदतीने बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी होते. जर तुम्ही रोज दोन कप हळदीचा चहाचा तुमच्या रुटीनमध्ये समावेश केला तर याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

हळदीच्या चहाचे फायदे

ब्लड शुगरला रेग्युलेट करण्यासोबत टर्मरिक टी पचनक्रियेसाठीही फायदेशीर आहे. आणि जेव्हा पचनक्रिया चांगली होते तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने काम करु लागते. हळदीमध्ये अ‍ॅंटी इनफ्लेमेटरी तत्व असतं आणि हे तत्व फॅट सेलची वाढ होऊ देत नाही. 

कसा कराल हा खास चहा?

हळद आणि आले : एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात चिमुटभर हळद आणि एक छोटा तुकडा आले टाका. चहा चांगला उकळू द्या, त्यानंतर चहा गाळून थोडा कोमट झाल्यावर सेवन करा. आले भूक कमी करतं आणि हळद मेटाबॉलिज्म रेट वाढतं. 

हळद आणि मिंट : जर तुम्हाला मिंट फ्लेवर पसंत असेल तर तुम्ही हळदीचा चहा मिंटसोबतही तयार करु शकता. मेंथॉलने फ्रेशनेस आणि पचनक्रिया चांगली राहते. तसेच याने फॅट इंजाइम्स एनर्जीमध्ये रुपांतरित होतील.

दालचीनी सोबत हळदीचा चहा : दालचीनी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते आणि हे तुम्ही हळदीच्या चहात मिश्रण करुन सेवन कराल तर याचा फायदा अधिक जास्त बघायला मिळतो. याने इन्सुलीन सेन्सिटीव्हिटी सुधारते आणि यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर प्रमाणात असतात. 

हळद आणि मध : हळदीसोबत तुम्हाला जर गोड चव हवी असे तर मधापेक्षा चांगला पर्याय नाही. वजन कमी करण्यासाठी मध फार फायदेशीर आहे. मधाने भूक कमी होते आणि वजन कमी करण्यास मदतही होते. 

(टिप : हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या, कारण यातील काही गोष्टींची काही लोकांना अ‍ॅलर्जी असू शकते. अशावेळी त्याचा विपरीत परीणाम होऊ नये म्हणून सल्ला घ्या.)

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य