भोपळ्याच्या बियांचं सेवन कराल तर नेहमीच दिसाल तरूण, टेंशनही होईल कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:27 IST2024-02-29T10:26:00+5:302024-02-29T10:27:05+5:30

Health Tips : या बियांचं सेवन केलं तर तुम्ही कमी वयात म्हातारे दिसणार नाहीत. आज या बियांचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips : Pumpkin Seeds benefits for type 2 diabetes, Mental health, and increase immunity | भोपळ्याच्या बियांचं सेवन कराल तर नेहमीच दिसाल तरूण, टेंशनही होईल कमी...

भोपळ्याच्या बियांचं सेवन कराल तर नेहमीच दिसाल तरूण, टेंशनही होईल कमी...

Pumpkin seeds benefits : भोपळा किंवा कोहळ्याची भाजी लोक आवडीने खातात. काही लोकांना याची भाजी आवडत नाही. कारण त्यांना याचे फायदे माहीत नसतात. भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असते. भोपळ्यात बियाही असतात. याचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात. या बियांचं सेवन केलं तर तुम्ही कमी वयात म्हातारे दिसणार नाहीत. आज या बियांचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टेंशन कमी होतं

आजकाल लोकांवर काम, फॅमिली आणि आर्थिक प्रेशर खूप वाढलं आहे. ज्यामुळे त्यांना नेहमीच टेंशन आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी भोपळ्याच्या बियांची मदत घेतली जाऊ शकते. कारण यात मॅग्नेशिअम असतं जे डोकं शांत करण्यास मदत करतं. त्याशिवाय भोपळ्याच्या बियांमधील झिंक आणि व्हिटॅमिन बी च्या माध्यमातून टेंशन दूर केलं जाऊ शकतं.

शांत झोप येईल

आजकाल लोकांना कमी झोप येण्याची समस्या होते. अनेक प्रयत्न करूनही शांत गाढ झोप लोकांना मिळत नाही. त्यामुळे रात्रभर लोकांना जागत रहावं लागतं. अशात भोपळ्याच्या बियांच्या मदतीने तुम्ही झोप न येण्याची समस्या दूर करू शकता. याच्या सेवनाने इनसोमनिया दूर होतो.

इम्यूनिटी होईल बूस्ट

कोरोना व्हायरस महामारीनंतर इम्यूनिटी बूस्ट करण्यावर खास जोर दिला जातो. ज्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आढळून येतं ज्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

डायबिटीसमध्येही फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन आवर्जून करावं. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्याने टाइप 2 डायबिटीसमध्ये आराम मिळतो. या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे मधुमेहावर रामबाण उपाय मानलं जातं. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

त्वचा राहते तरूण

भोपळ्याच्या बियांमध्ये कोलेजन असतं. कोलेजनमुळे हाडे आणखी मजबूत होतात. त्वचेचा लवचीकपणा वाढतो आणि यामुळे त्वचा आणखी तरूण आणि निरोगी दिसते. 
 

Web Title: Health Tips : Pumpkin Seeds benefits for type 2 diabetes, Mental health, and increase immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.