काही मिनिटांत शरीरातून निघून जाईल 'पोल्यूशन', बाबा रामदेव यांनी सांगितलं जबरदस्त 'सोल्यूशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:56 IST2024-12-17T17:55:54+5:302024-12-17T17:56:30+5:30

बाबा राम देव (Baba Ramdev) यांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. जो काही मिनिटांत शरीरातील प्रदुषणाचा सफाया करून रेडिएशन, टॉक्सिन बाहेर काढेल.

health tips Pollution' will removed from the body in a few minutes, baba ramdev ayurvedic remedies | काही मिनिटांत शरीरातून निघून जाईल 'पोल्यूशन', बाबा रामदेव यांनी सांगितलं जबरदस्त 'सोल्यूशन'

काही मिनिटांत शरीरातून निघून जाईल 'पोल्यूशन', बाबा रामदेव यांनी सांगितलं जबरदस्त 'सोल्यूशन'

दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणापासून आपला बचाव करण्यासाठी लोक मास्कचा वापर करतानाही दिसतात. प्रदूषित हवेमुळे, त्यात असलेले पोल्यूटेन्ट्स आपल्या फुफ्फुसात जातात आणि ब्लड स्ट्रीममध्ये पहोचून खोकला, डोळ्यांची जळजळ आदी समस्या निर्माण होतात. यामुळे विविध रेस्पिरेटरी आणि लंग्सचे आजार होऊ शकतात. अनेक वेळा तर यामुळे कॅन्सरही होऊ शकतो. 
 
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, यामुळे ब्रेनचे फंक्शन्सदेखील डिस्टर्ब होऊ शकते. हवा प्रदुषणामुळे स्ट्रोक, हार्ट डिसीज, COPD, लंग्स कॅन्सर, न्युमोनिया, मोतीबिंदू, टाइप 2 डायबिटीज, ल्यूकेमिया आणि फॅटी लिव्हर डिसीज सारखे घातक आजारही होऊ शकतात. यातच बाबा राम देव (Baba Ramdev) यांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. जो काही मिनिटांत शरीरातील प्रदुषणाचा सफाया करून रेडिएशन, टॉक्सिन बाहेर काढेल.

बाबा रामदेव यांचा उपाय -
दुधी भोपळ्याचं ज्यूस -

बाबा राम देव यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शरीरातून प्रदूषण काढून टाकण्याचा एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दुधी भोपळ्याचे ज्यूस प्यायल्याने प्रदूषित कण शरीरातून बाहेर पडतात. भोपळ्याचे सूप अथवा ज्यूस बनवून घेणे फायदेशीर ठरते. आपण यात, चवीसाठी आवळा, धणे, पालक आणि मेथीही टाकू शकता. यामुळे रसाचे पौष्टिक मूल्यही वाढते आणि नैसर्गिकरित्या आपले शरीर डिटॉक्सिफाय होते.

गोधन अर्क -
पेठ्याचे ज्यूसही प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त असल्याचे बाबा राम देव यांनी म्हटले आहे. हे देखील आपल्या शरीरातून प्रदूषण बाहेर काढते. याशिवाय गोधन अर्क प्यायल्यानेही शरीरातील सर्व प्रकारची विषारी द्रव्ये बाहेर पडतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सूजही दूर होते. गोधन अर्क खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही उपयुक्त आहे. ते प्यायल्याने लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो.

(टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ घरगुती उपचार, उपाय आणि सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आपण आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.)

Web Title: health tips Pollution' will removed from the body in a few minutes, baba ramdev ayurvedic remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.