रक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 08:42 PM2020-08-07T20:42:42+5:302020-08-07T20:46:29+5:30

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मक्याचे सेवन करू शकता. मक्याच्या सेवाने शरीराला पुरेश्या प्रमाणत व्हिटामीन्स मिळतात.

Health Tips In marathi : Health benefits of eating corn in rainy season | रक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

रक्ताची कमतरता भरून काढण्यासह पोट साफ होण्यास फायदेशीर मका; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

पावसाळा सुरू झाला बाजारात मके दिसायला सुरूवात होते. कधीतरी आवड म्हणून मका खाल्ला जातो. काहीजणांना भाजून लिंबू पिळून तर काही जणांना मक्याचे दाणे उकळून खायला फार आवडतं. आरोग्याच्या दृष्टीने मक्याचे अनेक फायदे आहेत. मक्याची भाजी, मक्याचे पॅटिस, भजी किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही मक्याच्या उकळलेल्या दाण्यांचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला मक्याच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. इतकंच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मक्याचे सेवन करू शकता. मक्याच्या सेवाने शरीराला पुरेश्या प्रमाणत व्हिटामीन्स मिळतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. मक्याकडे अँटी-ऑक्सीडेंट म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या सेवनाने जवळपास शरीरातील अँटी-ऑक्सीडेंट्सचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढते.

उर्जा मिळते

मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि उत्साह टिकून राहतो.

रक्ताची कमतरता दूर होते

मक्याचे कणीस खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन तसेच रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय मक्याचे कणीस खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 

हाडं बळकट राहतात

मका खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते. मक्यामधील आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरसचे प्रमाण असते. त्यामुळे वाढत्या वयात उद्भवत असलेल्या हाडांच्या आजारांपासून आराम मिळतो. 

हे पण वाचा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

Web Title: Health Tips In marathi : Health benefits of eating corn in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.