शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काही केल्या वजन कमी होईना? सकस आहार, दैनंदिन व्यायामाचं सूत्र ठरेल फायदेशीर; वाचा टिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:34 IST

वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Health Tips : वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने लठ्ठपणा हा आजार असल्याचे घोषित केले आहे. 

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा हा सर्व आजारांचा राजा असल्याचे सांगितलं गेलं आहे. वजन वाढत असेल तर तुमची दिनचर्या, आहार व व्यायाम यामध्ये योग्य समतोल राखणे खूप आवश्यक आहे. कुठल्याही एका गोष्टी मध्ये बदल करून चालणार नाही, त्याचा काहीही परिणाम होत नाही. 

सकाळी काय खाल? 

सकाळचा आहार हा दिवसभरातील आहारापेक्षा अधिक पोषक व जास्त प्रमाणात घेणे आवश्यक आहे. शिवाय तो प्रथिनयुक्त असणे आवश्यक आहे जसे की मोड आलेले कडधान्य, मूग डाळ, बेसन, तेलबिया, दूध व दुधाचे पदार्थ यांचा समावेश असणारा असावा. कुठलाही आहार घेताना तो फायबर युक्त असावा. असं तज्ज्ञ सांगतात. 

रात्रीच्या जेवणात काय असावे? 

पण रात्रीचे जेवण करताना काही गोष्टींचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. रात्रीचा आहार पूर्ण दिवसाच्या आहारापेक्षा हलका असावा. त्यामध्ये भाकरी, भाजी, सॅलड असेल तर उत्तमच आहे. रात्री भात नाही खाल्ला तर एक वेळ चालेल पण डाळीचा समावेश रात्रीच्या आहारात नक्की केला पाहिजे. त्याचबरोबर रात्रीचे जेवण ८ वाजण्यापूर्वी घेणे योग्य आहे. अशा पद्धतीने रात्रीचे जेवण घेतल्यास झोप चांगली लागते व ते सहज पचते. 

दुपारच्या जेवणात काय घ्यावे? 

ज्यांना शक्य असेल तर भाकरी भाजी सॅलड असा सुटसुटीत आहार दुपारच्या जेवणात घ्यावा. रात्रीपेक्षा भात दुपारी खाणे कधीही योग्य, असं तज्ज्ञांचं मत आहे.  दुपारच्या जेवणानंतर सायंकाळी भूक लागेल तेव्हा एखादे फळ, ताक, दही, ज्वारीच्या लाह्या, सूप असा पोषक आहार घ्यावा.

असं म्हणतात, आपली जीवनशैली सक्रिय असणे आवश्यक आहे. रोज ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. असे केल्याने आरोग्य सबाधित राहते. 

फावळ्या वेळेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा कमी वापर करावा. जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहणे टाळावे. त्यामुळे वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. 

लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी जैविक घडीचे अनुसरण करा. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात. त्यामुळे चयापचयाच्या क्रिया चांगल्या राहतात. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित अनुसरण केल्यास निश्चित वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल व आपले आरोग्य चांगले राहण्यास उपयोगी ठरेल.

हे खाणे टाळा-

तेलकट, खारवलेले पदार्थ, रेडी टू इट, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, मद्यपान हे टाळावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स