Health Tips : Benefits of black pepper for flu and fever, cough | कोरोना काळात सर्दी खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी 'हा' उपाय वापराल तर निरोगी रहाल

कोरोना काळात सर्दी खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी 'हा' उपाय वापराल तर निरोगी रहाल

सर्दी, खोकला, घसादुखीच्या समस्या सगळ्यांनाच उद्भवतात. पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे सर्दी, अंगदुखीची समस्या जाणवते. कोरोनाच्या माहामारीत साध्या समस्या उद्भवल्या तरी लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. सर्दी खोकल्यावर काळी मिरी ही रामबाण उपाय ठरू शकते. फक्त काळ्या मिरीचा वापर आहारात कसा करून घ्यायचा याबाबत योग्य माहिती असायला हवी. आज आम्ही तुम्हाला याबाबत नवीन माहिती देणार आहोत.

काळी मिरी हा मसाल्याचा पदार्थ अशी ओळख असून त्यात अनेक औषधीगुणधर्म असतात. आयरन, पोटॅशियम, मॅग्नीशियम, मँग्नीज, जिंक, क्रोमियम, व्हिटामिन ए यांसारखे पोषक तत्व असतात. जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल तर काळ्या मिरी आणि गरम दुधाचे सेवन करा.

काळ्या मिरीचा वापर केल्याने शरीरात साठलेले कफचे प्रमाण कमी होते. नाक चोंदण्याच्या समस्येमुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काळी मिरी हा उत्तम उपाय ठरेल. यामध्ये आजारांशी लढण्याचे गुण असतात. 

एखाद्याला ताप येत असेल तर काळ्या मिरीचा काढा करून प्या. तसंच जर  मलेरिया (malaria) झाला असेल तर काळ्या मिरीचं चूर्ण आणि तुळशीच्या रसामध्ये मध मिसळून पाणी प्यावं. त्यामुळे मलेरियाचा ताप लवकर बरा होतो.

याशिवाय काढा सुद्धा तुम्ही पिऊ शकता. त्यासाठी गरम पाण्याच आलं, तुळशीची पानं,वेलची, जायफळ काळीमिरी आणि गुळ घाला. १५ मिनिट हे पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद करा आणि या पाण्याचे सेवन करा. 

खोकल्याचा त्रास होत असल्यास काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून ३ ते ४ वेळा गोळी चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जाण्यास मदत होईल. तुम्हाला  कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्या किंवा एलर्जी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घरगुती उपाय करा.

एसीमुळे पसरतंय कोरोनाचं संक्रमण; संसर्गापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 'या' टिप्स 

युद्ध जिंकणार! 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips : Benefits of black pepper for flu and fever, cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.