CoronaVirus News : Coronavirus experts say air conditioning units need to be turned off | एसीमुळे पसरतंय कोरोनाचं संक्रमण; संसर्गापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 'या' टिप्स 

एसीमुळे पसरतंय कोरोनाचं संक्रमण; संसर्गापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 'या' टिप्स 

(Image credit- India Tribune)

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या जीवनशैलीत बदल घडून आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या जीवघेण्या व्हायरसच्या प्रसाराबाबात अनेक नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. एका अहवालानुसार कोरोना व्हायरस हा एसी असलेल्या ठिकाणी तसंच कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरतो असं स्पष्ट करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी जगभरातील अनेक देशातील तज्ज्ञांनी कोरोनाचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो असं पत्र लिहिले होते. अशा स्थितीत एसी बंद करणं फायद्याचे ठरेल असं अनेकांचे मत होते. परंतू संक्रमित व्यक्ती आजूबाजूला असल्यास संसर्ग होऊ शकतो.  

ब्रिटिश टेलिग्राफमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार एअर कंडीशनर्स दोन प्रकारचे असतात. एक बाहेरील हवा खेचून घेतो तर दुसरा खोलीतील हवेला सर्क्यूलेट करत असतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमणाचा धोका असल्यास लोकांनी एसी बंद करणं किंवा खिडक्या उघडणं उत्तम ठरेल. लंडनच्या चार्टर्ड इंस्टिट्यूशन ऑफ बिल्डिंग सर्वस इंजीनियर्सच्या म्हणण्यानुसार ज्या एसीमध्ये बाहेरच्या हवेचा वापर केला जात नाही त्यामुळे संपूर्ण खोलीत व्हायरस पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे रेस्टॉरंटसारख्या जागांमध्ये संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. 

ब्रिटेनच्या रॉयल एकेडमी ऑफ इंजीनियरिंगचे डॉ. शॉन फिट्जगेराल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा धोका कमी करण्यासाठी एसी चालू असताना खिडकी उघडणं फायदेशीर ठरेल. किंवा एसीचा  वापर न करणं  हा चांगला पर्याय असू शकतो. एप्रिलमध्ये चीनच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ९ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी रेस्टॉरंटच्या एसीला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. 

Emerging Infectious Diseases जर्नलमध्ये प्रकाशिक करण्यात आलेल्या माहितीनुसार वुहानचे एक कुटुंब गुआनझोऊच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलं होतं.  त्यावेळी या कुटुंबातील एक सदस्य  लक्षणं नसलेला कोरोनाबाधित होता. त्यामुळे ३ फुटांवर बसलेले दुसरे कुटुंबही कोरोनाबाधित झाले. दरम्यान जगभरातील तज्ज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून हवेतून होत असलेल्या कोरोना संक्रमणाबाबत माहिती दिली आहे. तसंच  गाईडलाईन्स बदलण्याचे आवाहन केले आहे.

खुशखबर! कोरोना विषाणूंना नष्ट करणार 'कोरोनाविर'; 'या' औषधानं रोखता येईल विषाणूंची वाढ

CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Coronavirus experts say air conditioning units need to be turned off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.