कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 01:00 PM2020-10-23T13:00:58+5:302020-10-23T13:06:59+5:30

Tips For Healthy Bone in Marathi: निरोगी हाडांसाठी कॅल्शियम, व्हिटामीन डी या शिवाय प्रोटीन, व्हिटामीन के, मॅग्नीशियम, पोटेशियम, व्हिटामिन सी यांचीही आवश्यकता असते.

Health Tips: Arthritis can also occur in young people, Expert tips to stay healthy | कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

Next

सांधेदुखीच्या सामान्य समस्येचं गंभीर आजारातही रूपांतर होऊ शकतं. पुरूषांच्या तुलनेत सर्वाधिक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. सांधेदुखीची अनेक कारणं असू  शकतात.  लठ्ठपणा, ब्लड कॅन्सर अशा समस्या वाढत्या वयात उद्भवतात. बोन फ्लूइड किंवा बोन मेंम्ब्रेनमध्ये परिवर्तन झाल्यामुळे या समस्या उद्भवतात. ओन्ली माय हेल्थशी बोलताना ऑर्थोपेडिक डॉक्टर अखिलेश यादव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. निरोगी हाडांसाठी कॅल्शियम, व्हिटामीन डी या शिवाय प्रोटीन, विटामिन के, मॅग्नीशियम, पोटेशियम, व्हिटामिन सी यांचीही आवश्यकता असते.  सध्या लॉकडाऊनमुळे लोक अनेक दिवस आपापल्या घरात बंद होते, परिणामी व्हिटामीन्सच्या अभावामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

कॅल्शियम शरीरात मोठ्या प्रमाणावर असतं. विविध कार्यासाठी कॅल्शियमचा  वापर केला जातो. प्रत्येक दिवसाला व्यक्तीला  १००० ते १२००  मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. हिरव्या ताज्या भाज्या कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहेत. व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास हाडं कमकुवत होतात. सुर्यप्रकाश व्हिटामीन डीचे सगळ्यात मह्त्वाचे  स्त्रोत आहे. पण जे लोक नेहमीच घरात बंद असतात त्यांना व्हिटामीन डी पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. परिणामी आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटामीन्सची कमतरता भरून  काढण्यासाठी अंडी, दूध, फळं, यांचा समावेश आहारात असायला हवा. 

आपल्या स्नायूंमधे योग्य ताकद असणं अतिशय महत्वाचं आहे. व्यायाम स्नायूंच्या बळकटीकरणासाठी तर उपयोगी आहेच पण हाडांमधील  कॅल्शिअमचं प्रमाण वाढवून त्यांच्या मजबुतीकरणासाठीसुद्धा अतिशय उपयुक्त ठरतो. व्यायाम केल्यानं आपल्या स्नायूंना एक आकार येतो आणि ताकदसुद्धा वाढते. तसेच ऑस्टिओपेरेयासिससारख्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. म्हणून घरच्याघरी  २० ते ३० मिनिटं वेळ काढून व्यायाम करणं आवश्यक आहे. 

या पदार्थांचा आहारात करा समावेश

अंजीर

अंजीर आरोग्‍यासाठी  लाभदायक  आहे. अंजीरात कॅल्‍शियम बरोबर फायबर, पोटेशियमची मात्रा आढळते. यामुळे हाडं मजबूत होतात. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहासाठी  गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात. शरीर संतुलित राहते. 

पनीर

पनीरमध्ये कॅल्शियमबरोबरच प्रोटीनसुध्दा असते. आहारात पनीरचा समावेश केल्यास कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहते. त्यामुळे हाड बळकट होतात. त्याशिवाय केस गळणंसुध्दा पनीरचं सेवन केल्याने थांबते. 
बदाम- बदाम हा कॅल्‍शियमचा चांगला स्‍त्रोत आहे. बदामात सर्व घटकापेक्षा  जास्‍त कॅल्‍शियम आढळते. कॅल्‍शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्‍त असते. बादामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.  

दुग्धजन्य पदार्थ

दुधयुक्‍त पदार्थात कॅल्‍शियमचे प्रमाण आढळते. दूध, पनीर, दही यांचा आहारात समावेश करायला हवा. यामुळे शरिरात कॅल्‍शियमची वाढ होण्‍यास मदत होईल. उपवास की वजन कमी होण्यासाठी उपाशी राहणं?; डायटिशियन रुजुता दिवेकरने सांगितला यातील फरक

संत्री 

प्रत्‍येकाने आहारात फळांचा समावेश करायला हवा. यामध्‍ये प्रामुख्‍याने संत्री या फळाचा वापर केला पाहिजे. संत्री या फळामध्‍ये डी जीवनसत्‍व व कॅल्‍शियम हा घटक आढळतो. सध्या हिवाळा सुरू झाल्याने संत्री मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे संत्र्याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. सावधान! रोजच्या वापरातील 'या' ६ वस्तूंमुळे होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, तंज्ज्ञांचा दावा

Web Title: Health Tips: Arthritis can also occur in young people, Expert tips to stay healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.