दोन कप 'पांढरा चहा' रोज प्या, १४ दिवसांत साखर नियंत्रणात, पाहा संशोधन काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 03:00 PM2021-10-04T15:00:09+5:302021-10-04T15:05:05+5:30

तुम्ही कधी पांढरा चहा प्यायला आहात का? डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा चहा खूप फायदेशीर आहे. याचे सेवन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही देखील डायबिटीसचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही पांढरा चहा घेऊ शकता.

health benefits of white tea for diabetes | दोन कप 'पांढरा चहा' रोज प्या, १४ दिवसांत साखर नियंत्रणात, पाहा संशोधन काय सांगते?

दोन कप 'पांढरा चहा' रोज प्या, १४ दिवसांत साखर नियंत्रणात, पाहा संशोधन काय सांगते?

googlenewsNext

जगात चहाचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. विशेषतः भारतात लोकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. लोक दिवसभरात अनेकवेळा चहा पितात. मात्र तुम्ही कधी पांढरा चहा प्यायला आहात का? डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा चहा खूप फायदेशीर आहे. याचे सेवन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही देखील डायबिटीसचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही पांढरा चहा घेऊ शकता.

पांढरा चहा कशापासून बनवला जातो?
कॅमेलियाच्या पानांपासून आणि फुलांपासून पांढरा चहा बनवला जातो. यात टॅनिन, फ्लोराईड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.  हा चहा डायबिटीस रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे इन्सुलिन प्रतिरोधनाचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासाठी दिवसभरात किमान दोन कप पांढरा चहा प्यावा.

याबाबत रिसर्चगेट डॉट नेटवर एक संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की पांढरा चहा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. यात पॉलीफेनॉल नावाचा घटक असतो, जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो. जळजळ, लठ्ठपणा आणि डायबिटीस कमी करण्यासाठी हा घटक फायदेशीर आहे. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. यामध्ये कॅमेलिया अर्क वापरण्यात आला. त्यामुळे संशोधक डायबिटीस रुग्णांना पांढरा चहा पिण्यास सांगत आहेत.

Web Title: health benefits of white tea for diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.