डोक्याला झालेली छोटीशी इजाही ठरू शकते घातक; दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:32 PM2019-07-26T14:32:02+5:302019-07-26T14:46:20+5:30

अनेकदा छोट्या दुखापतीकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र असं करणं महागात पडण्याची शक्यता आहे.

head injury minor head injury can be fatal do not carelessly | डोक्याला झालेली छोटीशी इजाही ठरू शकते घातक; दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

डोक्याला झालेली छोटीशी इजाही ठरू शकते घातक; दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

Next

प्रवासादरम्यान अथवा अन्य काही कारणांमुळे डोक्याला अनेकदा छोटी-मोठी इजा ही होत असते. अनेकदा छोट्या दुखापतीकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र असं करणं महागात पडण्याची शक्यता आहे, कारण डोक्याला झालेल्या दुखापतीचा परिणाम हा मानसिकतेवर होतो. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ब्रेन इन्ज्युरी या पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे. बर्फामध्ये साधं घसरून पडून इजा झाली किंवा मस्ती करताना डोकं थोडं आपटलं तरी ते घातक ठरू शकतं असा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. तसेच शरिरातील अनेक गोष्टींवर याचा परिणाम होतो. 

कॅनडाच्या मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीचे लेखक आणि या संशोधनाचे संचालक फॅनी लेकायर जीगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी डोक्याला छोटीशी दुखापत झाली होती आणि त्यानंतर गंध  (smell) ओळखण्याची क्षमता कमी झाली आहे. पण ही सर्वसामान्य गोष्ट आहे असं समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच डॉक्टरही याबाबत चौकशी करत नाहीत. त्यामुळे असं काही झालं तर ते स्वत: हून डॉक्टरांना सांगा. 

संशोधनासाठी 20 रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या आणि डोक्याला छोटीशी दुखापत झालेल्या काही रुग्णाची मदत घेण्यात आली. या रुग्णांना लसूण, लवंग, गुलाब यांचा सुगंध ओळखण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर जवळपास एक वर्षाने पुन्हा एकदा सर्व रुग्णांना सुगंध ओळखण्यास सांगितला. त्यावेळी आताची रुग्णाची गंध ओळखण्याची क्षमता आणि इजा झाली होती त्यावेळी असलेली गंध ओळखण्याची क्षमता याची तुलना करण्यात आली. त्यातूनच डोक्याला झालेली छोटीशी इजाही घातक ठरू शकते हे समोर आले आहे. 

मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर!

मेंदुचं कार्य व्यवस्थित व्हावं म्हणून रोज करा 'हे' सोपं काम!

निरोगी शरीरात शांत मन आणि तल्लख मेंदुचा निवास असतो. त्यामुळे केवळ हेल्दी आहार घेणे आणि हेल्दी लाइफस्टाईल हेच गरजेचं नाही तर नियमितपणे एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम गरजेचा असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, रोज छोट्या छोट्या एक्सरसाइज करून आपला मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. म्हणजे मेंदुच्या क्रियांमध्ये विकास होतो. वैज्ञानिकांच्या एका टीमने उंदरावर एक रिसर्च केला. या रिसर्चमध्ये त्यांना आढळले की, रोज छोट्या छोट्या एक्सरसाइज म्हणजे मधे मधे छोट्या एक्सरसाइज केल्याने एक जीन अ‍ॅक्टिवेट होतो, याने मेंदुच्या हिप्पोकॅम्पस भागातील न्यूरॉन्समधील कनेक्शनला आणखी मजबूत केलं जातं. मेंदुचा हा भाग स्मरणशक्ती आणि शिकण्यासंबंधी असतो.

 

Web Title: head injury minor head injury can be fatal do not carelessly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.