तुम्ही काळा तांदूळ पाहिला आहे का? फायदे सांगावे तितके कमीच;इतिहासच काय सांगतो बघा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:53 PM2021-05-11T16:53:16+5:302021-05-11T17:06:34+5:30

तुम्ही कधी काळ्या तांदळाचा भात खाल्ला आहे का? हे तर सोडाच तुम्ही काळ्या तांदळाविषयी ऐकलंय तरी का? सफेद तांदळापेक्षाही गुणकारी असतात काळे तांदुळ...

Have you seen black rice? The benefits are so many; see what history says ... | तुम्ही काळा तांदूळ पाहिला आहे का? फायदे सांगावे तितके कमीच;इतिहासच काय सांगतो बघा...

तुम्ही काळा तांदूळ पाहिला आहे का? फायदे सांगावे तितके कमीच;इतिहासच काय सांगतो बघा...

Next

भात (Rice) हे अन्न नसून भावना आहे असे मीम्स सोशल मिडीयावर आपण पाहिलेच असतील. कोकणी माणसांच तर जेवण भाताशिवाय अपूर्ण आहे. तांदळाचे अनेक पदार्थही तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असतील. पण मित्रांनो तुम्ही पांढरे तांदूळ खात असाल. तुम्ही काळे तांदूळ (Black Rice) पाहिले आहेत का? तुमचा विश्वास बसणार नाही पण काळ्या तांदळाची शेती आपल्या देशातही केली जाते. ती मोठ्या प्रमाणावर होत नाही. हे तांदूळ तुम्हाला दूकानात मिळणार नाहीत पण ऑनलाईन ग्रोसरी स्टोर्सवर हे काळे तांदुळ तुम्हाला मिळतील. आज आपण काळ्या तांदळाचे गुणधर्म, फायदे, इतिहास सर्व जाणून घेणार आहोत. 

काळ्या तांदळाचा इतिहास
काळ्या तांदळाची शेती चीनमध्ये फार पूर्वी केला जायची. त्याकाळात तिथे फक्त राजे महाराजेच काळ्या तांदळाचा भात खायचे. आता चीनमध्ये सर्वसामान्य माणसंही काळ्या तांदळाचा भात खातात.

अँटीऑक्सिडंट्स चा समावेश
काळा तांदुळ, सफेद तांदळाच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात गुणकारी आहे. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आपले शरीर आतून स्वच्छ ठेवतात. 

अँथसायनिन ठेवते हृदयाचे स्वास्थ्य निरोगी
काळ्या तांदळामध्ये अँथसायनिन असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे हृदयासंबधीच्या अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. हृदयरोगाचा धोका मोठ्याप्रमाणात कमी होतो. त्याचप्रमाणे या घटकामुळे रक्तातील शर्कराही योग्य प्रमाणात राहते.

वजन घटवते
सफेद तांदळाच्या तुलनेत काळ्या तांदळात फॅट्स कमी असतात. त्यामुळे वजन कमी होते. 

यकृत (liver)साठी उपयुक्त
काळे तांदूळ लीवरचे कार्य उत्तम ठेवतात. या तांदळामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे लीवर डिटॉक्स होण्यास मदत होते.

पचनशक्ती उत्तम राखते
काळ्या तांदळात फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you seen black rice? The benefits are so many; see what history says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app