डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:10 IST2025-10-02T09:08:25+5:302025-10-02T09:10:48+5:30
Semaglutide Ozempic: मधुमेह (डायबिटीज) आणि लठ्ठपणावर नियंत्रत मिळवण्यात परिणामकारक असलेल्या सेमाग्लुटाईड औषधीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
Health News: केंद्र सरकारने टाइप-२ डायबिटीजने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डेन्मार्कच्या एका औषधीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय औषधी गुणवत्ता नियंत्रण संस्थेने (CDSCO) सेमाग्लुटाइड (Semaglutide) नावाची औषधी भारतीय बाजारात विकण्यास परवानगी दिली आहे.
ही औषधी ओझेम्पिक (Ozempic) नावानेही ओळखली जाते. ही औषधी बाजारात इंजेक्शनच्या स्वरुपात विकली जाणार आहे. सेमाग्लुटाइड शरीरात इन्सुलिनसारखं काम करते.
कोणत्या रुग्णांसाठी सेमाग्लुटाइड फायदेशीर?
ही औषधी त्या रुग्णांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्याची ब्लड शुगर फक्त खाण्याची पथ्ये पाळल्याने किंवा व्यायामाने नियंत्रणात येत नाही. किंवा ज्यांना जुन्या औषधींचा फार फायदा होत नाहीये. ज्यांना जुन्या औषधीमुळे त्रास होत आहे.
हार्ट अटॅकपासून वजन कमी करण्यापर्यंत परिणामकारक
ही औषधी ह्रदयविकार, ह्रदयविकाराचा झटका अशा ह्रदयाशी संबंधित गंभीर आजारांचा धोकाही कमी करते. जगभरात या औषधीच्या चाचण्या झाल्या असून, त्यातून हेही सिद्ध झाले आहे की, ही औषधी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठीही ही औषधी फायदेशीर आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका ही औषधी
भारतात १०.१० कोटी लोक सध्या डायबिटीजने त्रस्त आहेत. १३.६ कोटी लोक येणार्या काळात डायबिटीज ग्रस्त होऊ शकतात, असा अंदाज आहे. सीडीएससीओच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही औषधी त्याच रुग्णांसाठी फायदेशीर आहे, ज्यांना जुन्या किंवा सध्या सुरू असलेल्या औषधांने काहीही फरक जाणवत नाहीये.
ही औषधी घेण्यासाठी लोकांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर ही औषधी घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.