मानसिक तणावावर रामबाण आहेत ही फळे, पाहा ताण कशी चुटकीसरशी कमी करतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 17:41 IST2021-11-21T14:22:25+5:302021-11-21T17:41:27+5:30
दीर्घकाळापर्यंतचा ताण केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. तणावामुळे रक्तदाब, हृदय गती, श्वसन, चयापचय आणि तुमच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढतो, काही फळे मानसिक तणावाशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.

मानसिक तणावावर रामबाण आहेत ही फळे, पाहा ताण कशी चुटकीसरशी कमी करतात...
वेगवान आणि अत्यंत स्पर्धात्मक जगात तणावाच्या परिणामांबद्दल बोलणे अत्यंत महत्वाचे आहे, तणाव ही एक समस्या आहे जी जगभरातील अनेक लोकांसाठी एक प्रमुख चिंतेची बाब बनली आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की चिंता आरोग्यासाठी खूप घातक आहे. ही चिंता अनेक गंभीर आजारांना जन्म देते. मानसिक तणावाची अनेक कारणे असू शकतात. कधी-कधी याचा संबंध आरोग्याशी असतो, तर अनेक कौटुंबिक वादही यासाठी कारणीभूत ठरतात.
मानसिक तणावावर योग्य वेळी उपचार न केल्यास तो गंभीर धोका बनू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दीर्घकाळापर्यंतचा ताण केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. तणावामुळे रक्तदाब, हृदय गती, श्वसन, चयापचय आणि तुमच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढतो, काही फळे मानसिक तणावाशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.
पेरू :- व्हिटॅमिन सी समृद्ध फळांच्या सेवनाने मानसिक ताण कमी होतो. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे थंडीच्या दिवसात याचे सेवन केल्याने माणसाला अनेक आजारांशी लढण्याची ताकद मिळते आणि तणाव कमी होतो.
द्राक्ष :- द्राक्षांमध्ये पाणी, सोडियम, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते, जे मानसिक तणाव दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
ब्लूबेरी :- एका संशोधनात असे आढळून आले आहे की ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी, ई आढळते, जे तणाव दूर करते आणि शरीर मजबूत ठेवते. त्याच वेळी, याच्या सेवनाने स्मरणशक्ती तीक्ष्ण राहते.
किवी :- तणाव दूर करण्यासाठी किवी वरदानापेक्षा कमी नाही. त्यात लोह आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. तणावाचा सामना करण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.
संत्री :- संत्र्यामुळे मानसिक ताण दूर होतो. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की हे फळ आपल्यावरील मानसिक तणाव दूर करते.
केळी :- केळीमध्ये अनेक जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि फॉस्फरस आढळतात. तणावाच्या परिस्थितीत केळीचे सेवन फायदेशीर ठरते. यासोबतच अशा परिस्थितीत केळीच्या सालीपासून बनवलेला चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.