तुम्हालाही वारंवार तहान लागते? वेळीच व्हा सावध! असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 03:09 PM2024-01-23T15:09:59+5:302024-01-23T15:11:40+5:30

पाणी पिणे ही एक नैसर्गिक प्रकिया आहे. शिवाय तहान लागणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण असले तरी सतत तहान लागणे ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. 

Frequent thirst can be dangerous for health may symptoms of diabetes and or other diseases | तुम्हालाही वारंवार तहान लागते? वेळीच व्हा सावध! असू शकतो 'हा' गंभीर आजार

तुम्हालाही वारंवार तहान लागते? वेळीच व्हा सावध! असू शकतो 'हा' गंभीर आजार

Health Tips : पाणी हे जीवन आहे. तसेच आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सकस आहारासोबतच मुबलक पाणी पिऊन शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे मानले जाते. पण याउलट जर तुम्ही पाणी पिऊनही तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका.

काही लोकांना खूप कमी पाणी पिण्याची सवय असते. तर सारखे पाणी पिऊनही अनेकदा काहींना सारखी तहान लागते. यामागे देखील काही कारणे दडलेली आहेत. त्यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. जर शरीराला एखाद्या गंभीर आजाराने ग्रासले असेल तर त्याआधी आजार होण्यापूर्वी सुरुवातीला शरीरामध्ये काही लक्षणे जाणवतात. 

तहान लागण्याची प्रमुख कारणे -

१. निरोगी राहण्यासाठी मुबलक पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. कमी पाणी पिणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. 

२. ज्याप्रमाणे कमी पाणी पिणे आरोग्यासाठी घातक मानले जाते त्यानूसार जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरासाठी धोकादायक आहे, असे आरोग्यतज्ञांचे मत आहे. 

३. काही लोकांना एकदा पाणी पिल्यानंतर सारखी तहान लागते, घसा कोरडा पडतो. यामागे काही खास कारणे असतात. 

४. सतत तहान लागल्यास ही डायबीटीज असल्याची लक्षणे आहेत ,असे आरोग्यतज्ञांचे मत आहे.

५. शिवाय ठराविक कालावधीनंतर जर तुम्हाला तहान लागत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. 

६. जर तुम्हाचे तोंड कोरडे होत असेल तर तुमच्या  तोंडात लाळ ग्रंथी योग्य प्रमाणात लाळ तयार करत नसतील, तर तुम्हाला नेहमीच तहान लागते.

७. काही लोकांना पचनाशी संबंधित काही समस्यांमुळे जास्त तहान लागते.

Web Title: Frequent thirst can be dangerous for health may symptoms of diabetes and or other diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.