फक्त बोटांच्या छोट्याश्या चाचणीवरून ओळखता येतो फुफ्फुसांचा कॅन्सर, घरच्या घरी करता येते ही टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:46 PM2021-09-22T15:46:22+5:302021-09-22T16:15:22+5:30

आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. या चाचणीला फिंगर क्लबिंग टेस्ट असे म्हणतात.

flinger clubbing test to know lung cancer | फक्त बोटांच्या छोट्याश्या चाचणीवरून ओळखता येतो फुफ्फुसांचा कॅन्सर, घरच्या घरी करता येते ही टेस्ट

फक्त बोटांच्या छोट्याश्या चाचणीवरून ओळखता येतो फुफ्फुसांचा कॅन्सर, घरच्या घरी करता येते ही टेस्ट

Next

आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. या चाचणीला फिंगर क्लबिंग टेस्ट असे म्हणतात.

या चाचणीद्वारे आपल्याला फिंगर क्लबिंग असल्यास म्हणजेज बोटांना सूज आली असल्यास किंवा नखांच्या खालील त्वचा मऊ झाली असल्यास आपल्याला समजते. ही  फुफ्फुसांचा कर्करोगाची लक्षणे असू शकतात. नॉन-स्मॉल सेल या प्रकारचा फुफ्फुसांचा कर्करोग असलेल्या ३५ टक्क्यांहून अधिक लोकांना फिंगर क्लबिंगचा अनुभव येतो, असे कॅन्सर रिसर्च यूकेने सांगितले आहे.

एक अतिशय सोपी चाचणी आहे, ज्याला स्कॅमरॉथ विंडो टेस्ट किंवा फिंगर क्लबिंग टेस्ट म्हणतात. यासाठी तुमची तर्जनी किंवा अंगठ्याची नखे फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्र दाबा आणि त्यांच्यामध्ये हिऱ्याच्या आकाराची एक लहान खिडकी दिसते का ते पहा. जर तुम्हाला मध्ये थोडीही जागा दिसत नसेल तर तुम्हाला त्वरित डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे.

कॅन्सर रिसर्च युकेने दिलेल्या माहिती नुसार, थायरॉईड समस्या किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या इतर समस्या असलेल्या काही लोकांमध्ये देखील क्लबिंग फिंगर आढळू शकते. फिंगर क्लबिंग असामान्य आहे. जर तुम्हाला ते असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोललेले कधीही चांगले. ते तुमची तपासणी करून इतर लक्षणांबद्दल माहिती घेऊ शकतात.

Web Title: flinger clubbing test to know lung cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app