शरीराचं वजन वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. अशातच आणखी एक नवीन बाब समोर येत आहे. ती म्हणजे, शरीरामध्ये पाणी जमा झाल्यामुळेही तुमचं वजन वाढू शकतं. अनेकदा सकाळी डोळ्यांखाली असलेली सूज, फुगलेलं पोट यांसारख्या गोष्टी शरीरामध्ये पाणी जमा होण्याची लक्षणं असू शकतात. अशातच शरीरात पाणी जमा झाल्यामुळे वाढणाऱ्या वजनापासून सुटका करून घेणं सोपी गोष्ट नाही. परंतु, यासाठी जबाबदार ठरणारी कारणं काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही नक्कीच कमी करू शकता. 

(Image Credit : Women's Health)

जास्त मीठ किंवा कार्बोहायड्रेट 

शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होण्याच्या सर्वात मोठ्या कारणांमध्ये शरीरातील मिठाचं प्रमाण वाढणं, हे सर्वात मोठं कारण आहे. खरं तर मिठामधील सोडिअम पाण्यासोबत एकत्र येऊन पाणी शरीरामध्ये जमा करण्याचं कारण ठरतं. सोडिअमच्या जास्त सेवनाने शरीरामध्ये द्रव पदार्थ वाढण्याचा आणि एकत्र होण्याचा धोका अधिक वाढतो. याचप्रमाणे जर तुम्ही जास्तीत जास्त कार्ब्सयुक्त आहाराचे सेवन करत असाल तर हे शरीरातील स्नायूंमधील द्रव पदार्थांवर प्रभाव टाकण्याचं काम करतात. 

(Image Credit : Star2.com)

बर्थ कंट्रोल हार्मोन्स 

बर्थ कंट्रोल हार्मोन्सही कधी-कधी शरीरामधील पाण्याचं वजन वाढवू शकतात. बर्थ कंट्रोल पिल्समधील ऐस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन शरीराचं वजन कमी जास्त करण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

(Image Credit : Mindful.org)

कोर्टिसोलचा स्तर 

कोर्टिसोल, ज्याला 'डिप्रेशन हार्मोन्स' म्हणूनही ओळखलं जातं. अनेकदा हे तुमच्या शरीरातील पाण्याचं वजन वाढवण्यामागील मुख्य कारण असतं. हे हार्मोन्स ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म संतुलित ठेवण्याचं आणि सूज कमी करण्याचं काम करतात. 

औषधांचा परिणाम 

काही औषधं, जी तुम्ही आधीपासूनच घेत आहात. किंवा काही वेळानंतर पुन्हा घेण्यास सुरुवात केली असतील तर हेदेखील शरीरामध्ये पाण्यामुळे वाढणाऱ्या वजनासाठी कारणीभूत ठरतात. 

एवढं पाणी पिणं असतं आवश्यक

एक निरोगी व्यक्तीने दररोज 8 ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणं आवश्यक असतं. ज्या व्यक्ती हाय फायबर डाएट घेत असतील त्यांनी 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

अशावेळी जास्त पाणी पिणं आवश्यक...

  • ड्राय, मसालेदार आणि फॅट्स असलेले पदार्थ खाल्यानंतर ते पचवण्यासाठी जास्त पाणी पिणं आवश्यक असतं. 
  • चटपटीत पदार्थ खाल्यानंतर जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. कारण अतिरिक्त मीठ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. 
  • जर तुम्ही सतत तणावामध्ये असाल, यावेळीही जास्त पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 
  • जेवढं जास्त तुमचं वजन आहे, तुम्हाला तेवढंच जास्त पाणी पिणं आवश्यक असतं. यामुळे डायजेशन, ब्लड सर्क्युलेशन आणि शरीराची इतर कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत होते. 
  • एक्सरसाइज किंवा वर्कआउट करत असताना तुम्हाला जास्त पाणी पिणं आवश्यक असतं. 

 

वॉटर वेट गेन असं थांबवू शकता... 

  • मिठाचं जास्त सेवन करणं 
  • जास्त चहा, कॉफी आणि मद्यसेवन करणं टाळा. 
  • नियमितपणे एक्सरसाइज करा, ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. 
  • हायड्रेटिंग पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 


Web Title: Excess water may aid weight gain these are the symptoms
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.