शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

रोज सकाळी अनाशापोटी खा 'हा' सुकामेवा...अपचन, वेट लॉस आणि आणखीही बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:33 IST

सुके अंजीर (Dry Fig) हा असाच बहुगुणी सुका मेवा (Dry Fruit) आहे. अंजिराची ताजी फळं सुकवून तयार केलेले सुके अंजीर अत्यंत गुणकारी असतात.

जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. भारतीय आहारात प्रत्येक पदार्थाचं खास वैशिष्ट्य आहे. त्याचे गुणधर्म आणि ऋतुमानानुसार त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम यानुसार आपल्याकडे आहार ठरवला जातो. सुके अंजीर (Dry Fig) हा असाच बहुगुणी सुका मेवा (Dry Fruit) आहे. अंजिराची ताजी फळं सुकवून तयार केलेले सुके अंजीर अत्यंत गुणकारी असतात. त्याविषयीची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'टाइम्स बुल'ने प्रसिद्ध केलं आहे. सुक्या अंजिरांचे शरीराला काय फायदे होतात, हे आपण जाणून घेऊया.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीरसकाळी रिकाम्या पोटी सुके अंजीर खाल्ले, तर ते फायदेशीर ठरतं. त्यात ए आणि बी व्हिटॅमिन, प्रथिनं, फायबर्स, तसंच भरपूर अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. डाएट, योग, व्यायाम यांच्या जोडीला सुके अंजीर आहारात नियमितपणे ठेवले, तर लठ्ठपणा नक्कीच कमी होऊ शकतो.

पोट साफ होण्यावर रामबाण उपायजीवनशैली बदलाचा एक ठळकपणे जाणवणारा परिणाम म्हणजे पोट साफ न होण्याच्या वाढत्या तक्रारी. त्याचंच रूपांतर पुढे मूळव्याध (Constipation), फिशर, फिस्तुला अशा अवघड जागेच्या दुखण्यांमध्ये होतं. सुकं अंजीर हा त्यावरचा एक रामबाण उपाय ठरू शकेल. त्यातल्या फायबर्समुळे (Fibers) पोट साफ होण्यास मदत होते व अ‍ॅसिडिटीची समस्याही कमी होते. भरपूर फायबर्स असलेल्या फळांचं सेवन पोट साफ न होण्याच्या तक्रारीवर गुणकारी ठरतं.

रिकाम्या पोटी करा सेवनसुक्या अंजिराचं सेवन रिकाम्यापोटी केल्यामुळे त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं शरीरात व्यवस्थित शोषली जातात. त्यामुळे शरीराला त्याचा अधिक फायदा मिळतो. अंजिरातले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाचं कार्य सुरळीत राखण्यासाठीही अंजीर फायदेशीर असतात. हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असणारं कॅल्शिअम (Calcium) सुक्या अंजिरांत असतं. त्यामुळे सुके अंजीर खाल्ल्यानं हाडं मजबूत बनतात.

पोषणमूल्यांनी युक्त असलेला सुका मेवा आहारात असावा, असं डॉक्टर सांगतात. काजू, बदाम, बेदाणे, काळ्या मनुका आपण नेहमी खातो. त्यासोबत सुके अंजीरही आवर्जून खायला हवेत. सुके अंजीर वर सांगितल्याप्रमाणे सकाळी रिकाम्यापोटी खाता येतात. एरव्हीही खाऊ शकता. कोणाला नुसते सुके अंजीर खायला आवडत नसतील, तर सुक्या अंजिरापासून खीर, बर्फी असे काही पदार्थ तयार करता येऊ शकतात. मुलांना आवडतील असे मिल्कशेक, हलवा, अंजीर स्प्रेड आदी पदार्थही तयार करता येऊ शकतात. जीवनशैलीतले बदल काही वेळा अनिवार्य असतात; मात्र अशा वेळी आहार-विहारात ठरवून केलेले योग्य बदल शरीराचं नुकसान होऊ देणार नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स