शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

कोणत्या वेळी फळं खाल्ल्याने जास्त होतो फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 12:55 IST

अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं.

(Image Credit : www.theodysseyonline.com)

वेगवेगळी फळं आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतात हे काही वेगळं सांगायला नको. पण अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं. कोणत्याही वेळी फळं खाल्ल्याने व्यक्तीला पचनाची समस्या, पोटदुखी, अनिद्रा इतकेच नाही तर डायबिटीजसारखी गंभीर समस्याही होऊ शकते. एका अभ्यासाते हे आढळून आले आहे की, दिवसातील कोणत्याही विशेष वेळी फळं खाल्ल्याने शरीरावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा प्रभाव पडू शकतो. 

नुकसानदायकही होऊ शकतात फळं

काही फळं ही सकाळच्या वेळी खाल्ल्याने शरीराला लगेच आणि अतिरीक्त एनर्जी मिळते. तर काही फळं त्याचेवळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळत नाही. सामान्यपणे फळं खाण्याची योग्य वेळ यासाठी महत्त्वाची आहे. कारण फळांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. जे सामान्य ग्लूकोजमध्ये बदलून शरीराला ऊर्जा प्रदान करतात. पण हे ग्लूकोज जेव्हा शरीराकडून उपयोगात आणलं जात नाही, तेव्हा ते चरबीच्या रुपात जमा होतं. यामुळे वजन वाढण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात. 

सकाळची वेळ फळं खाण्यासाठी योग्य

तज्ज्ञांनुसार, फळं खाण्याची योग्य वेळ ही सकाळची असते. सकाळी रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया फळातील ग्लूकोजचं वेगाने विघटन करतं. त्यामुळे शरीराला फळातील पोषक तत्त्वांचा फायदा होतो. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासोबतच शरीरात रक्त वाढवण्यासही मदत करतात. मात्र योग्य वेळीच फळं खाल्ले तर यातील पोषक तत्त्वे शरीराला मिळतात. त्यामुळे फळांमधील पोषक तत्वांचा फायदा घ्यायचा असेल तर सकाळी जास्तीत जास्त फळं खावीत. 

हेल्दी स्नॅक्स

तुम्ही सकाळी वेगवेगळ्या फळांना एकत्र करुन स्नॅक्सच्या रुपातही खाऊ शकता. त्यासोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यानच्या वेळेतही तुम्ही फळं खाऊ शकता. सकाळी नाश्त्यावेळी सफरचंद, पपई, कलिंगड किंवा किवी ही फळं खाऊ शकता.

सायंकाळीही होतो फायदा

सकाळ सोबतच दोन जेवणांच्या मधल्या वेळेतही फळं खाणं चांगलं मानलं जातं. कारण दोन जेवणांच्या मधल्या काळात पोट रिकामं असतं. अशावेळी पोटात वेगवेगळ्या प्रकारचे एंजाइम रिलीज होतात. याने पचनक्रियेला गती मिळते आणि फळांमध्ये असलेलं ग्लूकोज सहजपणे पचतं. तसेच शरीराला फायबर, मिनरल्स आणि इतरही पोषक तत्व मिळतात. तसेच सायंकाळीही फळं खाणं महत्त्वाचं ठरतं. 

वजन नियंत्रणात राहतं

दोन जेवणांच्या मधल्या वेळेत फळं खाणं यासाठीही चांगलं असतं, कारण याने व्यक्तीची भूक संपत नाही. तसेच फळं सहजपणे लवकर पचतात. या वेळेत फळं खाल्ल्याने व्यक्तीचं वजनही नियंत्रित राहतं आणि जाडेपणाची समस्याही होत नाही.  

टॅग्स :fruitsफळेHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स