सोरायसिस होण्याआधी शरीरामध्ये होतात हे बदल; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 14:28 IST2019-09-21T14:18:13+5:302019-09-21T14:28:36+5:30
त्वचेचं इन्फेक्शन सोरायसिसच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. हा एक क्रोनिक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे आहे.

सोरायसिस होण्याआधी शरीरामध्ये होतात हे बदल; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
त्वचेचं इन्फेक्शन सोरायसिसच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. हा एक क्रोनिक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे आहे. ज्यामध्ये त्वचेच्या पेशीं वेगाने तयार होतात. मोठ्या प्रमाणावर पेशी तयार झाल्यामुळे तवचेवर स्केलिंगचं कारण होतं. योग्य वेळी यावार उपाय केले नाहीतर यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लोकमत न्यूज इनने दिलेल्या माहितीनुसार, एका अहवालामध्ये जगभरात सोरायसिसमुळे तीन टक्के लोक म्हणजेच 12.50 कोटी लोक प्रभावित असल्याचे सांगितलं जातं.
सोरायसिसच्या सामान्य लक्षणांमध्ये इन्फेक्शन झालेल्या काही भागांमध्ये खाज येते. त्वचेवर पांढरे चट्टे दिसू लागतात. तसेच शरीरामध्ये लाल डाग आणि चट्टे येतात. सतत येणाऱ्या खाजेमुळे त्वचा लाल होते आणि त्यावर जखमा तयार होतात. यावर कोणताही संपूर्ण उपाय नाही. परंतु, ही लक्षणं कंट्रोल करणं शक्य असतं.
सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशीं त्वचेवर वेगाने वाढतात आणि हळूहळू स्केलिंग होतं. स्केल साधारणतः हाताचे कोपर आणि गुडघ्यांवर विकसित होतात. याव्यतिरिक्त हात, पायांचा पंजा, मान आणि चेहऱ्यावरही होतं. अनेक प्रकरणांमध्ये सोरायसिस नखं, तोंड यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये प्रभावित होतात.
सोरायसिसची लक्षणं :
सोरायसिसची लक्षणं लोकांमध्ये वेगवेगळी असतात आणि सोरायसिसच्या प्रकारांवर निर्भर करतात. सोरायसिसचे निशाण कोपरावर लहान असतात. अनेकदा हे चट्टे शरीराचा जास्तीत जास्त भागावर पसरतात. त्वचा लाल होणं, त्यावर चट्टे पडणं, जळजळ होणं, नखं जाड होणं, सांधे दुखणं ही सोरायसिसची लक्षणं आहेत.
सोरायसिसपासून बचाव करण्यासाठी हे पदार्थ खा :
1. ताक
आयुर्वेदानुसार, सोरायसिस हा आजार झाल्यास आहारात ताकाचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचा आणि केस हेल्दी राहतात.
2. कडुलिंब
कडुलिंबाची पानं सोरायसिसवर उपचार म्हणून अत्यंत फायदेशीर ठरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. यामुळे सोरायसिस आणि पिंपल्सवर उपचार करण्यास मदत होते.
3. सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असणारी पोषक तत्व शरीरामधील सूज कमी करतात. जसं ओमेगा 3 फॅटी अॅसिड. त्याचबरोबर त्यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे हार्मोन्स सिक्रीशन बॅलेन्स करण्यासाठी मदत करतात.
4. अॅन्टी इंफ्लेमेटरी पदार्थ
जांभूळ, चेरी, सार्डिन, मासे आणि मसाले ड्रायफ्रुट्स या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
5. विषारी तत्व निर्माण करणाऱ्या पदार्थांपासून दूर रहा
आयुर्वेदानुसार, काही असे पदार्थ ज्यांच्या सेवनाने शरीरामध्ये विषारी तत्व तयार होतात. त्यांचं सेवन करणं टाळणं फायदेशीर ठरतं. जसं, मिल्कशेक आणि दही चुकूनही एकत्र खाऊ नका.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)