Healthy Drink : तुळशीची पानं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. फार पूर्वीपासून तुळशीची पानं, बिया, मुळांचा वापर आयुर्वेदात औषधी म्हणून केला जातो. तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि आयर्नसारखे अनेक पोषक तत्व असतात. आयुर्वेदानुसार सकाळी उपाशीपोटी जर तुळशीच्या पानांचं पाणी प्याल तर आरोग्य चांगलं राहतं. अशात ते प्यावं आणि याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊ.
कसं बनवाल तुळशीच्या पानांचं पाणी?
तुळशीच्या पानांचं पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दोन कप पाणी टाकून उकडून घ्या. आता धुतलेली काही तुळशीची पानं उकडलेल्या पाण्यात टाकून कमीत कमी पाच मिनिटे उकडू द्या. नंतर हे पाणी एका कपात गाळून काढा. पाणी कोमट झाल्यावर यात थोडं मध टाकून प्या.
हृदय राहतं निरोगी
हृदय नियमितपणे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोज तुळशीच्या पानांचं पाणी पिऊ शकता. तुळशीच्या पानांच्या पाण्यात आढळणारे अनेक पोषक तत्व अनेक हृदयरोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात. अधिक फायदा मिळवण्यासाठी हे पाणी रोज सकाळी उपाशीपोटी प्यावं.
इतर काही फायदे
तुळशीच्या पानांचं पाणी प्यायल्यास गट हेल्थसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या लगेच दूर करण्यासाठी तुम्ही हे खास पाणी नियमितपणे पिऊ शकता. तुळशीचं पाणी रोज प्याल तर सर्दी-खोकला-कफ अशा समस्याही दूर होतात. त्याशिवाय तुळशीच्या पानांच्या पाण्यानं सगळ्यात मोठं महत्व म्हणजे यानं बॉडी डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
कोलेस्टेरॉल होईल कमी
तुळशीच्या पानांच्या पाण्यासोबतच तुम्ही जर रोज सकाळी उपाशीपोटी काही तुळशीची पानं खाल्ली तर शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. कोलेस्टेरॉल कमी करणारे अनेक तत्व या पानांमध्ये असतात. सोबतच ही पानं खाल्ल्यास इम्यूनिटीही बूस्ट होते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून आपला बचाव होतो.