बेंबीत दुखंतय आणि जळजळ होतेय? वापरा 'हे' साधे सोपे घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:10 IST2021-07-23T16:09:26+5:302021-07-23T16:10:00+5:30
बेंबीत दुखत असेल तर याचे कारण फक्त इन्फेक्शन नसुन पोटातील समस्यांमुळे बेंबीत दुखु शकते. या समस्येवर इलाज म्हणून साध्या सोप्या घरगुती उपायांचा उपयोग तुम्ही करू शकता.

बेंबीत दुखंतय आणि जळजळ होतेय? वापरा 'हे' साधे सोपे घरगुती उपाय
बेंबीच्या दुखण्याची अनेक कारणे असू शकतात जसे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, जखम, इन्फेक्शन. बेंबीत दुखत असेल तर याचे कारण फक्त इन्फेक्शन नसुन पोटातील समस्यांमुळे बेंबीत दुखु शकते. या समस्येवर इलाज म्हणून साध्या सोप्या घरगुती उपायांचा उपयोग तुम्ही करू शकता. डॉ. मनीष सिंह यांनी हे उपाय ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला सांगितले आहेत.
टीट्री ऑईल
टी ट्री ऑईल हा बेंबीच्या दुखण्यालर रामबाण इलाज आहे. तुम्ही टीट्री ऑईलची पान नारळ तेलासोबत गरम करून बेंबीला लावू शकता. जर तुमच्याकडे टीट्री ऑईल असेल तर ते थेट नारळ तेलासोबत मिसळून बेंबीला लावा सकाळपर्यंत आराम पडेल.
झेंडुचं फुल
झेंडुची फूल बेंबी मध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असेल तर त्यावर गुणकारी आहेत. तुम्ही झेंडुच्या फुलांच्या पाकळ्या पाण्यात गरम करा. पाणी अर्धे झाल्यावर तुम्ही ते नारळ पाण्यात मिक्स करून लावू शकता. तुमच्याकडे झेंडुचं तेल असेल तर ते लोशन किंवा क्रीम सोबत बेंबीला लावू शकता.
नारळ तेल
नारळ तेलात अँटी इन्फेम्लेटरी व अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. नारळ तेलाच्या गुणामुळे केवळ बेंबीचं इन्फेक्शन दुर होत नाही तर नाभीची जळजळ आणि सुजही कमी होते. तुम्ही नारळ तेल कंरगळीच्या साह्याने बेंबीत सोडू शकता. याचा उपयोग तुम्ही अनेकदा करू शकता.
हिंग
नाभीचे दुखणे बरेचदा पोट दुखीमुळेही असू शकते. पोट दुखीसाठी हिंगही फार गुणकारी आहे. हींगेची गोळी किंवा हिंग पावडरला पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी नंतर नाभीवर ठेवा. दुखणे कमी होईल.
जिरं
जिऱ्याचं पाणीही पोट दुखीसाठी फार उपयुक्त आहे. बेंबीचं दुखणं यामागे पोट दुखीही कारणीभूत असू शकते. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यामुळे पोटदुखी होऊ शकते. पोट दुखीवेळी कोमट पाण्यात जीरं टाकून ते पाणी प्यायलं तर लगेच पोटाला आराम मिळतो.