शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घाईघाईत खाणं ठरू शकतं वजन वाढण्याचं कारणं; अन्न चावून खाल्यानं शरीराला 'असा' होतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 12:03 IST

Health Tips in Marathi : रोजच्या अशा काही सवयींमुळे माणसाचं वजन कमी होता होत नाही. त्यामुळे फिटनेसवर प्रभाव पडतो यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आहारातील वेगवेगळ्या सवयी बदलून तुम्ही आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकता.

तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे. कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला.  जीवनशैलीतील वेगवेगळ्या सवयींचा आणि बदलांचा माणसाच्या आरोग्यावर नकारात्मक आणि सकात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होत असतो. जर वजन कमी करण्याबाबत विचार केला तर रोजच्या अशा काही सवयींमुळे माणसाचं वजन कमी होता होत नाही. त्यामुळे फिटनेसवर प्रभाव पडतो यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आहारातील वेगवेगळ्या सवयी बदलून तुम्ही आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकता.

कमी वेगानं जेवणं आणि वजन कमी होणं

प्रत्येक व्यक्तीचा जेवणाचा  वेग वेगवेगळा असतो. काही लोक म्हणतात की,  हळू  हळू खाल्यानं लोक आळशी आणि आजारी होतात. वास्तविक पाहता हळू हळू जेवल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करणारे लोक  दिवसभर शरीरात घेतल्या जात असलेल्या कॅलरीजवर लक्ष देतात. हळूहळू जेवणाच्या सवयीमुळे पोट पूर्णपणे भरलेलं वाटतं लवकर भूक लागत नाही.  त्यामुळे लोक जास्त कॅलरिज घेत नाहीत. परिणामी वजन कमी व्हायला सुरूवात होते.

पोषक तत्व मिळतात

बरेच लोक वेगाने अन्न खातात आणि नंतर पोटात दुखणं आणि अपचन होण्याचा सामना करावा लागतो. हळू हळू खाल्ल्याने पचन सुधारते आणि अन्न सहज पचते. यासह, शरीराद्वारे पोषक द्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. अन्न हळूहळू चघळण्याने आणि खाण्याने मेंदू निरोगी आणि शांत राहतो. यामुळे तणावाची पातळी कमी होते आणि मन शांत होते.

हळूहळू जेवल्यानं खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. हळूहळू अन्न खाऊन तुम्ही अन्नाची चव अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकता. या व्यतिरिक्त, अन्नाचा स्वाद, सुगंध आपल्याला समाधान देईल. International Women's Day: आता महिला बिंधास्तपणे वापरू शकतात Menstrual Cups; असा करा वापर

भूक कमी लागते

आपली भूक आणि कॅलरीचे प्रमाण हार्मोन्सद्वारे मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जाते. जेवणानंतर, आपले आतडे घरेलिन नावाचे हार्मोन दाबून ठेवते, जे भूक नियंत्रित करते आणि पोट भरते. हे अतिसेवनापासून बचाव करण्यास मदत करते. या प्रक्रियेस सुमारे 20 मिनिटे लागतात. सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

सकारात्मक प्रभाव 

जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं. 

कॅविटीपासूनच बचाव

जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही. 

बॅक्टेरिया नष्ट होतात

जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्न