कॉफी पिऊन चिंता-तणाव कमी करण्यास मिळेल मदत, जाणून घ्या योग्य प्रमाण अन् रहा टेंशन फ्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:53 IST2026-05-15T11:52:29+5:302026-05-15T11:53:18+5:30
Coffee for Stress Free : कॉफीने स्ट्रेस कमी होतो म्हणजे काय दिवसभर कपावर कप कॉफी बसावं का? तर अजिबात नाही. त्यासाठी एक खास प्रमाण सांगण्यात आलंय. ते काय जाणून घेऊया.

कॉफी पिऊन चिंता-तणाव कमी करण्यास मिळेल मदत, जाणून घ्या योग्य प्रमाण अन् रहा टेंशन फ्री...
Coffee for Stress Free : अनेक हेल्थ एक्सपर्ट नेहमीच सल्ला देत असतात की, नियमितपणे कॉफी पिण्याचे फायदे किती आणि कसे मिळतात. खरंतर कॉफीने प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण कॉफीने केवळ शरीरालाच नाही तर मानसिक आरोग्याला देखील फायदा मिळतो. म्हणजे हल्लीच एका संशोधनातून समोर आलंय की, कॉफी पिऊन आपण स्ट्रेस कमी करू शकता. पण म्हणजे काय दिवसभर कपावर कप कॉफी बसावं का? तर अजिबात नाही. त्यासाठी एक खास प्रमाण सांगण्यात आलंय. ते काय जाणून घेऊया.
किती कप कॉफी स्ट्रेस कमी करते?
दररोज एक-दोन कप कॉफी प्यायल्याने फक्त झोप उडत नाही, तर मानसिक आरोग्यालाही फायदा होऊ शकतो, असं एका नव्या अभ्यासात समोर आलं आहे. Fudan University येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, दिवसाला 2 ते 3 कप कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये तणाव आणि मूड डिसऑर्डरचा धोका कमी आढळला.
या संशोधनात 4.6 लाखांहून अधिक लोकांचा 13 वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यात असं दिसून आलं की, मर्यादित प्रमाणात कॉफी पिणाऱ्यांचं मानसिक आरोग्य तुलनेनं चांगलं होतं. मात्र 5 किंवा त्यापेक्षा जास्त कप कॉफी प्यायल्यास फायदा कमी होऊ शकतो.
कसा मिळतो फायदा?
कॉफीमध्ये असलेलं कॅफिन आणि अँटिऑक्सिडंट्स मेंदूमधील डोपामिन आणि सेरोटोनिनसारख्या “फील गुड” केमिकल्सवर परिणाम करतात. त्यामुळे मूड सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत मिळू शकते.
तज्ज्ञांच्या मते, कॉफी थकवा कमी जाणवायला मदत करते. त्यामुळे लोक अधिक सक्रिय राहतात, व्यायाम करतात आणि मित्रांसोबत वेळ घालवतात. या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. मात्र, फक्त कॉफीवर अवलंबून राहून मानसिक आरोग्य चांगलं राहणार नाही. पुरेशी झोप, नियमित व्यायाम, निसर्गात वेळ घालवणे आणि चांगले सामाजिक संबंध हेही तितकेच महत्त्वाचे आहेत.
महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक फायदा
विशेष म्हणजे, कॉफी आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंध पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत अधिक मजबूत आढळला. डॉ. झियांग गाओ यांच्या मते, महिलांमध्ये कॅफिनचे मेटाबॉलिझम तुलनेने हळू होत असल्याने समान प्रमाणात कॉफी घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅफिनचा प्रभाव जास्त काळ राहू शकतो.
डॉ. गाओ सांगतात की, मर्यादित प्रमाणात कॉफी पिणे हे निरोगी जीवनशैलीचा भाग ठरू शकते. मात्र, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त कॉफीवर अवलंबून राहता येणार नाही. पुरेशी झोप, व्यायाम, संतुलित आहार आणि चांगले सामाजिक संबंध हेही तितकेच महत्त्वाचे आहेत.