काय आहे घोरण्याच्या समस्येचं कारण? जाणून घ्या बंद करण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:28 PM2022-01-28T14:28:49+5:302022-01-28T14:35:24+5:30

Snoring Problem : जास्तीत जास्त लोक रात्री झोपेत घोरतात, ज्यामुळे बाजूला झोपलेल्या व्यक्तीची झोप खराब होते. इतकंच नाही तर घोरण्यामुळे अनेकांची लग्नेही मोडली आहेत.

Do you snore loudly throughout the night know how overcome these problem | काय आहे घोरण्याच्या समस्येचं कारण? जाणून घ्या बंद करण्याचे उपाय

काय आहे घोरण्याच्या समस्येचं कारण? जाणून घ्या बंद करण्याचे उपाय

googlenewsNext

घोरण्याचं (Snoring) ठोस असं कारण समोर येऊ शकलेलं नाहीये. पण काही सवयी बदलून अनेकांना होणारी ही समस्या दूर केली जाऊ शकते. जास्तीत जास्त लोक रात्री झोपेत घोरतात, ज्यामुळे बाजूला झोपलेल्या व्यक्तीची झोप खराब होते. इतकंच नाही तर घोरण्यामुळे अनेकांची लग्नेही मोडली आहेत.

काय आहे कारण?

'बीबीसी' च्या वृत्तानुसार, झोपेदरम्यान आपण सगळे श्वास घेतो आणि श्वास सोडतो तेव्हा आपली मान आणि डोक्याच्या सॉफ्ट टिश्यूमध्ये कंपन होतं. ज्यामुळे काही लोक घोरतात. हे सॉफ्ट टिश्यू आपल्या नाकात, टॉन्सिल आणि तोंडाच्या वरच्या भागात असतात. अशात जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा हवा जाण्याचा मार्ग आरामाच्या स्थितीत असतो, तेव्हा हवा आत - बाहेर करण्यासाठी जोर लावावा लागतो. ज्यामुळे सॉफ्ट टिश्यूजमध्ये कंपन निर्माण होतं.

घोरणं रोखण्यासाठी काय करता येईल?

- सर्वातआधी दारू सेवन बंद करा. कारण दारू प्यायल्याने झोपेदरम्यान मांसपेशी अधिक रिलॅक्स होतात, यामुळे हवेचा मार्ग आकुंचन पावतो आणि लहान होतो. त्यामुळे झोपण्याआधी दारू पिऊ नका.

- त्यासोबतच झोपताना एका कडावर झोपावं. रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही सरळ पाठीवर झोपता तेव्हा हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे घोरणं वाढतं. अशात तज्ज्ञ एका कडावर झोपण्याचा सल्ला देतात.

- तसेच बाजारात घोरणं रोखण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादनं आहे. अशात नाकावर लावायची पट्टी घेऊ शकता. पण याने काही प्रभाव पडेल याचा काही ठोस पुरावा नाही. या पट्ट्यांबाबत सांगितलं जातं की, याने तुमच्या नाकातील हवेचा मार्ग मोकळा होतो. हे तेव्हा काम करतं जेव्हा तुम्ही नाकाने घोरता.

- नाक नेहमी स्वच्छ ठेवा. कारण जेव्हा तुम्हाला सर्दी होते तेव्हा तुमचं नाक बंद होतं. अशात तुमची घोरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी नाक चांगल्याप्रकारे स्वच्छ करा.

- घोरण्याचं सर्वात कारण वजन मानलं जातं. कारण जर तुमचं वजन जास्त असेल तर कंठाच्या ठिकाणी जास्त टिश्यू असू शकतात. याने हवेचा मार्ग आकुंचन पावतो आणि अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घोरणं सुरू होतं.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवरून देण्यात आले आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. काहीही करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.)

Web Title: Do you snore loudly throughout the night know how overcome these problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.