शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसोबत घरातच करा या फनी अ‍ॅक्टिविटीज, मुलं होतील शरीराने मजबूत आणि चपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:39 IST

Children Health : याचा फायदा ते मजबूत होण्यासाठी, त्यांच्यात चपळता आणि हुशारी येण्यासाठी नक्कीच होईल. याने मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. 

Children Health : आपली लहान मुले नेहमीच निरोगी, फिट रहावी आणि बुद्धीमानही व्हावी असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. पण यासाठी आपण काय करतो? असा एक प्रश्नही स्वत:ला विचारायला हवा. लहान मुले स्वत:हून सगळ्याच गोष्टी करतात असं नाही. काही गोष्टी त्यांच्याकडून करवून घ्याव्या लागतात. आजकाल मुलांचं मोकळ्या मैदानात खेळणं कमी झालंय आणि ते जास्तीत जास्त वेळ टीव्ही-मोबाइल बघतात. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकासही योग्यपणे होत नाही आणि त्यांचं आरोग्यही बिघडत राहतं. (Best Activities for Kids at Home)

टीव्हीवरील वेगवेगळे टॅलेंट शो पाहून सगळ्यांना वाटत असतं की, आपलं मुलही असं झालं पाहिजे किंवा त्यालाही असं काही आलं पाहिजे. तो एखाद्या खेळात तरबेज असला पाहिजे. पण असं होण्यासाठी तुमचं लहान मूल शरीराने मजबूत आणि चपळ असलं पाहिजे. असं जर तुम्हालाही वाटत असेल तर त्यांच्यासोबत काही अ‍ॅक्टिविटीज तुम्ही घरात करू शकता. मुलांच्या फायद्यासाठी तुम्ही थोडा वेळ त्यांच्याकडून काही अ‍ॅक्टिविटीज खेळता खेळता करून घेऊ शकता. 

सध्या इन्स्टावर डॉ. अंकित गुप्ता यांनी एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. ज्यात एक वडील आपल्या मुलाकडून अ‍ॅक्टिविटी करून घेत आहे. या अ‍ॅक्टिविटी लहान मुलांना सहजपणे आवडतील आणि ते खेळल्यासारख्या या अ‍ॅक्टिविटी करतील. याचा फायदा ते मजबूत होण्यासाठी, त्यांच्यात चपळता आणि हुशारी येण्यासाठी नक्कीच होईल. याने मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. 

तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता की, यात एक व्यक्ती मुलासोबत खेळत आहे. या गोष्टी मुलांसोबत केल्यातर मुलांची हाडे मजबूत होतील. त्यांचं बॅलन्स आणि शरीराचं पोश्चर सुधारेल. त्यांचा स्ट्रेस आणि चिडचिडपणा कमी होईल, तसेच त्यांचा पालकांसोबतचे संबंध चांगले मजबूत होतील. एक महत्वाचा फायदा असाही होईल की, याने मुलांचं टीव्ही आणि मोबाइल बघणंही कमी होईल. चला तर मग लागा कामाला आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल करा.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स