रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आहे अतिधोकादाय, बळावतील 'हे' गंभीर आजार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 12:43 PM2021-07-25T12:43:58+5:302021-07-25T12:44:42+5:30

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो.

do not sleep on empty stomach, habit is very dangerous, consequences are risky | रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आहे अतिधोकादाय, बळावतील 'हे' गंभीर आजार...

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आहे अतिधोकादाय, बळावतील 'हे' गंभीर आजार...

Next

आपल्याला जास्त काम असल्यामुळे किंवा जेवण बनवून खाण्याचा कंटाळा आल्यामुळे आपण न जेवता किंवा न काही खाता फक्त पाणी पिऊन झोपतो. परंतु अशी रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनूसार, लठ्ठपणामुळे ग्रस्त बर्‍याच लोकांना असे वाटते की, रात्री रिकाम्या पोटी झोपल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहेत. जरी तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी, रात्री हलके अन्न खालेच पाहिजे, रिकाम्या पोटी कधीही झोपू नये. (sleeping empty stomach)

रिकाम्या पोटी झोपेण्याचे तोटे काय? 


स्नायू कमकुवत होण्याचा धोका
जे लोक रात्री रिकाम्या पोटी झोपतात त्यांचे स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो, रिकाम्या पोटी झोपल्याने प्रथिने आणि एमिनो ऍसिडच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ लागतो. स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी, अन्न योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे महत्वाचे आहे.


निद्रानाशची समस्या
जर तुम्ही दररोज रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल तर, आपल्याला निद्रानाशाचा सामना करावा लागू शकतो. कारण जेव्हा आपण रात्री रिकाम्या पोटी झोपतो, तेव्हा तुमचा मेंदू आपल्याला जेवण जेवायला हवे असे सिग्नल देत असतो. ज्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. जेव्हा तुम्ही काही न खाता नेहमी झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला झोपेचा त्रास (Health) होऊ लागतो. जी हळूहळू तुमची सवय बनते आणि हीच निद्रानाशाच्या समस्येची सुरुवात असते.

उर्जा पातळी कमी होते
जर तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल, तर तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला दिवसभर कमकुवत आणि थकल्यासारखे वाटू शकते. जी नंतर कालांतराने आपल्या शरीरासाठी एक मोठी समस्या बनू शकते.

चयापचय प्रक्रियेत अडथळा
आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, जर तुम्ही अनेक दिवसांपासून रात्रीचे जेवण वगळत असाल किंवा तुमची खाण्याची पद्धत योग्य नसल्यास तुम्हाच्या चयापचयनावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतो.यामुळे तुमची इन्सुलिन पातळी असंतुलित होऊ शकते. कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची पातळी देखील चिंताजनक होऊ शकते. तुम्ही योग्य वेळी, योग्य अन्न न खाल्ल्याने तुमच्या संप्रेरकांवर परिणाम होईल, ज्यामुळे तुम्हाला बर्‍याच रोगांचे आजार उद्भवू शकतात.

Web Title: do not sleep on empty stomach, habit is very dangerous, consequences are risky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.