शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

पुरूषांमधील इन्फर्टिलिटीचं 'हे' कारण मेडिकल टेस्टमधूनही येत नाही समोर - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 11:15 IST

केवळ महिलांमध्येच काहीतरी कमतरता असल्याने इन्फर्टिलिटीची समस्या होते असं नाही तर पुरूषांमध्येही काही कमतरता असल्याने त्यांना पिता होण्याचं सूख मिळू शकत नाही.

(Image Credit : medicalnewstoday.com)

केवळ महिलांमध्येच काहीतरी कमतरता असल्याने इन्फर्टिलिटीची समस्या होते असं नाही तर पुरूषांमध्येही काही कमतरता असल्याने त्यांना पिता होण्याचं सूख मिळू शकत नाही. अशीच एक समस्या निर्माण करण्याला जबाबदार असतात हिस्टोन्स. आश्चर्याची बाब म्हणजे मेडिकल टेस्टमध्येही यांची माहिती मिळत नाही.

sciencedaily.com ने दिलेल्या वृत्तानुसार,  ज्या पुरूषांमध्ये फर्टिलिटीशी संबंधित समस्या असते, त्यांची समस्या सामान्यपणे मेडिकल टेस्ट दरम्यान समोर येते आणि त्यानुसार त्यांच्यावर उपचारही केले जातात. पण अनेकदा असंही होतं की, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आल्यावरही पुरूषांना पिता होण्याचं सूख मिळू शकत नाही. यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून वैज्ञानिक रिसर्च करत होते.

काय आहे हिस्टोन्स?

(Image Credit : irbbarcelona.org)

हिस्टोन्स एक खासप्रकारचे क्षारीय प्रोटीन असतात, जे यूकेरियोटिक सेल न्यूक्लिअसमध्ये आढळतात. हे न्यूक्लियोसोम स्ट्रक्चर सेल्समध्ये डीएनए रेग्युलेट करतात. हिस्टोन एक खासप्रकारच्या समस्येच्या रूपात मेल फर्टिलिटीमध्ये अडचण बनून समोर येतात.

अनेक वर्षांनी लागला शोध

(Image Credit : americanpregnancy.org)

पेन्सिलवेनिया विश्वविद्यालयात करण्यात आलेल्या नव्या रिसर्चमध्ये काह  एपिजेनेटिक कारणांची माहिती मिळवण्यात आली आहे. हे अस्पष्टपणे पुरूषांच्या इन्फर्टिलिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अभ्यासकांना आढळलं की, या अस्पष्ट कारणांमध्ये हिस्टोनचा देखील समावेश आहे.

आतापर्यंत काय होता समज?

गेल्या दहा वर्षांपासून अभ्यासक पुरूषांच्या इन्फर्टिलिटीसाठी त्या शुक्राणूंना कारणीभूत मानत होते, जे फर्टाइल होऊ शकत नाहीत आणि डेव्हलपमेंट दरम्यान हिस्टोनला काढू शकत नाही. कारण फर्टिलिटीच्या स्पर्म्सना डीएनएमधून हिस्टोन नावाच्या प्रोटीनला वेगळं करायचं असतं. अशात जे स्पर्म असं करू शकत नव्हते, त्यांना पुरूषांमध्ये इन्फर्टिलिटीसाठी जबाबदार मानले जात होते.

हिस्टोन्सचे फायदे-तोटे

काही रिसर्चमध्ये हिस्टोन्सला महत्वपूर्ण जीन प्रमोटर मानलं आहे. तर काही रिसर्चमध्ये त्यांना निकामी मानलं आहे. ताज्या रिसर्चनुसार, या दोन्ही रिसर्चमध्ये सत्य असल्याचं मान्य केलं. रिसर्चचे मुख्य अभ्यासक जे. लुइंस म्हणाले की, काही स्थितींमध्ये भ्रूणाच्या विकासाठी हिस्टोनची स्थिती गरजेची असते तर काही जागांवर यांची अजिबात गरज राहत नाही.

येणाऱ्या काळात फायदा

हा रिसर्च जर्नल डेव्हलपमेंट सेलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी स्पर्ममधील बदलाच्या मेकॅनिझमला समजून घेतलं. आता या रिसर्चनंतर या समस्येवर आवश्यक ते उपाय करण्यास मदत मिळेल. अभ्यासकांनी असेही सांगितले की, अनेक केसेसमध्ये हिस्टोनचं चुकीच्या जागी असणं हेही पुरूषांमध्ये इन्फर्टिलिटीचं कारण बनतं. कारण याने भ्रूणाच्या विकासात अडचणी निर्माण होतात. या रिसर्चनंतर आता हे आम्हाला कळून चुकलं की, ज्या स्थितींमध्ये स्पर्म डीएनएमधून हिस्टोनला वेगळं करू शकत नाही त्या स्थितीत भ्रूणाच्या विकासासाठी सपोर्टची गरज असते.

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्यPregnancyप्रेग्नंसी