शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईनमुळे मुंबई बाहेरील एकाचा मृत्यू

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

- मुंबईत स्वाईनचे आढळले ७ नवे रुग्णमुंबई : मुंबईत शनिवारी स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण आढळले असून मुंबई बाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील स्वाईनच्या रुग्णांची संख्या ८० असून मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या ३८ इतकी आहे. ठाण्याच्या ३० वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या आठवर ...


- मुंबईत स्वाईनचे आढळले ७ नवे रुग्ण
मुंबई : मुंबईत शनिवारी स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण आढळले असून मुंबई बाहेरून मुंबईत उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील स्वाईनच्या रुग्णांची संख्या ८० असून मुंबई बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या ३८ इतकी आहे. ठाण्याच्या ३० वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या आठवर गेली आहे.
३१ जानेवारी पासून ठाणे परिसरात राहणार्‍या ३० वर्षीय महिलेत स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून येत होती. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला प्लॅटिनम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिची प्रकृती खालावल्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी तिला सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिला न्युमोनियाची लागण झाली. त्यातच तिची प्रकृती खालावल्याने शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश येथून ४७ वर्षीय पुरुषास स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. तर, गुजरातमधील ३२ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ५ आणि १७ वर्षाची दोन मुले आहेत. अंधेरी पूर्व येथे राहणार्‍या ५ वर्षीय मुलाला स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्याच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. चर्नी रोड येथील १७ वर्षीय मुलावरही बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. दादरच्या ५५ वर्षीय महिलेला, जुहूच्या ३६ वर्षीय महिलेला, माहिमच्या ५९ वर्षीय पुरूषास. कुर्ल्याच्या ५६ वर्षीय पुरूषास आणि पवईच्या ३३ वर्षीय पुरूषास स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्व रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.