कोरोनाने होणारे मृत्यू आणि डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेंशन या आजारांचा संबंध कसा?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:49 PM2020-10-14T12:49:49+5:302020-10-14T13:00:00+5:30

CoronaVirus News & Latest Updates : डायबिटिस, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार,  हृदयासंबंधी आजार असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. 

Covid19 deaths connection with co morbidities in india know all the details | कोरोनाने होणारे मृत्यू आणि डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेंशन या आजारांचा संबंध कसा?; जाणून घ्या

कोरोनाने होणारे मृत्यू आणि डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेंशन या आजारांचा संबंध कसा?; जाणून घ्या

Next

भारतात कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे पाहिल्यास दिसून येईल की, मंगळवारी मगील  दीड महिन्यांपासून सगळ्यात कमी मृत्यूंची नोंद झाली होती. मंगळवारी देशभरात ७०६  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर १.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. डायबिटिस, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार,  हृदयासंबंधी आजार असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. 

समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसने संक्रंमित झाल्यास या आजारांनी ग्रासलेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. या आजारातील  १७.९ टक्के रुग्णांनी कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर आपले प्राण गमावले आहेत. ज्यांना कोरोनाशिवाय इतर  कोणतेही आजार नव्हते अशा लोकांपैकी १.२ टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांवरून दिसून येत की भारतात दोन्ही प्रकारच्या आजारांनी मिळून एकूण १.५ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. 

४५ ते ६० वर्ष वयोगटातील मृतांची संख्या १३.९ टक्के आहे या वयोगटातील अनेक लोक हे गंभीर आजारांनी पीडित होते. तर १.५ टक्के लोकांना कोणताही दुसरा आजार नव्हता. ६० वर्षावरील मृतांमध्ये  २४.६ टक्के लोक कोरोनासह गंभीर आजारांनी पीडित होते. तर ४.८ टक्के लोकांना कोणतेही आजार नव्हते. ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मृतांमध्ये ८.८ टक्के लोकांना कोरोनासह इतर आजार उद्भवले होते. तर  ०.२ टक्के लोकांना कोणतेही आजार उद्भवले नव्हते. हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येतं की, जास्त प्रमाणात तरूण कोरोना संक्रमित होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होत असलेले ५३ टक्के लोक ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये ७० टक्के पुरूष असून ३० टक्के महिलांचा समावेश आहे. मोठा दिलासा! कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लसीकरण कधी सुरू होणार? सरकारने दिले संकेत

दूसरा संक्रमण ज्यादा गंभीर

दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 72,39,390 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 63,509 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 730 जणांचा मृत्यू झाला आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,10,586 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाची पुन्हा लागण होत असल्याची माहिती मिळत आहे. रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन 

देशात कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची माहिती मिळत आहे. तसेच देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी 100 दिवस निश्चित करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला 100 दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हाँगकाँगमध्ये याआधी अशा केसेस समोर आल्या होत्या. त्यानंतर आता भारतात आल्या आहेत.  'या' कारणामुळे कोरोनाला रोखण्यात चीनने मारली बाजी; लोक आता बिनधास्त करतायेत पार्ट्या

Web Title: Covid19 deaths connection with co morbidities in india know all the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.