Covid 19 novel air filter to catch and kill coronavirus developed by scientist | खुशखबर! संशोधकांचं मोठं यश; हवेतून पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणार हा खास 'फिल्टर'

खुशखबर! संशोधकांचं मोठं यश; हवेतून पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणार हा खास 'फिल्टर'

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारबाबत तज्ज्ञांच्या संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ आणि फार्मा कंपन्या कोरोनाच्या माहामारीपासून लोकांचा बचाव करण्यासाठी लस औषध आणि वेगवेगळी उपकरणं तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून होतं. याबाबत तुम्हाला कल्पना असेलच.

 गेल्या काही दिवसात तज्ज्ञांनी दिलेल्या माहिती कोरोना व्हायरसचं संक्रमण हवेतूनही पसरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू हवेतून पसरतो याबातचे कोणतेही पुरावे उपलब्ध झालेले नाहीत असं सांगितले आहे. तरीही इतर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर खरंच हवेच्या माध्यमातून कोरोनाचं संक्रमण पसरत असेल तर धोका उद्भवण्याची शक्यता आहे. 

अलिकडे  संशोधकांनी एक असा एअर फिल्टर (Novel air filter) तयार केला आहे. ज्याद्वारे हवेतील विषाणूंना नष्ट करता येऊ शकतं. शास्त्रज्ञांना तयार केलेला हा फिल्टर शाळा, रुग्णालये आणि विमानांसारख्या बंद ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो. मटेरियल टुडे फिजिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार या 'एअर फिल्टर' मधून जाणारी हवा ९९.८टक्के  कोरोना व्हायरसचा नष्ट होऊ शकतो.

CoronaVirus Marathi News video shows how droplets spread air with and without mask | CoronaVirus News : MASK लावायचा कंटाळा येतो?,

यूएस युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनमधील तज्ज्ञ झिफेंग रेन यांनी दिलेल्या माहितीनुसार,“हा फिल्टर विमानतळ आणि विमान अशा सार्वजनिक ठिकाणी कोव्हिड-19 चा प्रसार रोकण्यासाठी फायदेशीर ठरेल.  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस सुमारे तीन तास हवेमध्ये राहू शकतो, म्हणून लवकरच या फिल्टरचा वापर केला पाहिजे. यातील निकेल फोम महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

याशिवाय हवेतील प्रसारापासून बचावासाठी त्यासाठी घरातून बाहेर निघताना मास्क लावणं गरजेचं आहे. तसंच कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये. बाहेर निघाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. कारण जर कोरोनाचा प्रसार हवेतून होत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं धोक्याचं ठरू शकते. हवेतून होत असेलल्या संसर्गापासून लांब राहण्यासाठी कमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी जाणं टाळा, एसीचा वापर करू नका. घरी कोरोना रुग्ण असल्यास बाथरूम आणि कोरोना रुग्णांची खोली स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. 

रोजच्या वापरातील 'या' वस्तूंमुळे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या बचावाचे उपाय

अभिमानास्पद! 'या' व्यक्तीवर होणार भारतातील कोरोना लसीचे पहिले परिक्षण; जाणून घ्या प्रक्रिया

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid 19 novel air filter to catch and kill coronavirus developed by scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.